'माझ्यासोबत 50 पेक्षा जास्त वेळा ठेवला शरीर संंबंध पण..', पोलिसाचे तरूणीसोबत धक्कादायक कृत्य!

'माझ्यासोबत-50-पेक्षा-जास्त-वेळा-ठेवला-शरीर-संंबंध-पण.',-पोलिसाचे-तरूणीसोबत-धक्कादायक-कृत्य!

लग्नाचं आमिष दाखवत तरूणींची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरण आपण पाहिली आहेत. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये एका पोलिसाने लग्नाचं आमिष दाखवत तरूणीसोबत शारीरिक संंबंध ठेवले. पीडितेने तिची फसवणुक होत असल्याचं लक्षात येताच पोलीस स्थानकात धाव घेत संबंधित पोलीस शिपाईविरोधात तक्रार दाखली केली आहे. (girl accused policeman of raping her pretext marriage latest marathi crime news) 

Updated: Dec 27, 2022, 08:09 PM IST

Crime News : लग्नाचं आमिष दाखवत तरूणींची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरण आपण पाहिली आहेत. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये एका पोलिसाने लग्नाचं आमिष दाखवत तरूणीसोबत शारीरिक संंबंध ठेवले. पीडितेने तिची फसवणुक होत असल्याचं लक्षात येताच पोलीस स्थानकात धाव घेत संबंधित पोलीस शिपाईविरोधात तक्रार दाखली केली आहे. (girl accused policeman of raping her pretext marriage latest marathi crime news) 

नेमकं काय घडलं? 
लखनऊमधील कानपूर ग्रामीण भागात कॉन्स्टेबल सुनील कुमार सिंग ड्युटीवर होता. तिथे त्याची एका तरूणीसोबत ओळख होते. दोघेही एकमेकांचा नंबर घेऊन व्हाट्सअपवर चॅट करू लागतात. दोघांच्याही मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं त्यादरम्यान सुनील तिला लग्नाचं आमिष देतो.  

लग्नाच्या आमिषाला संबंधित तरूणी भुलते आणि त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू लागते. सुनील सिंग काही दिवसानंंतर तिच्या रूमवर यायला जायला लागला. काहीवेळा तो तरूणीच्या घरीच रात्र काढायचा, तो अनेकदा रूमवर येऊ लागला आणि रात्री राहायचा वेगवेगळ्या प्रकारे आमिष दाखवून जबरदस्तीने संबंध ठेवू लागला. 

काहीवेळा तर शरीर संबंध ठेवण्यासाठी नकार दिल्याने तो तिला धमकवायचाही. अनेक दिवस असंच सुरू राहिलं यादरम्यान पोलिसाने त्या पीडित मुलीसोबत 50 पेक्षा अधिकवेळा शरीर संबंध ठेवले. तरूणीचा विश्वास जिंकण्यासाठी संबंधित पोलीस हवालदाराने त्याच्या भावासोबत ओळख करून दिली. अजय सिंग असं भावाचं नाव असून तो गुजरातमध्ये काम करतो.

सुनीलच्या भावासोबत बोलणं झाल्यानंतर पीडित तरूणी त्याच्यावर विश्वास ठेवू लागली. मात्र जेव्हा मुलीने त्याला लग्नासाठी विचारलं त्यावेळी तेव्हा सत्य समोर आलं. कारण त्यावेळी लग्नाला घरच्यांचा विरोध असून आता आपलं लग्न होऊ शकणार नसल्याचं सुनीलने सांगितलं. 

तरूणीने पोलिसात धाव घेत सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. सुनीलने आपण पोलिसात असून मला कोणी काही करू शकत नसल्याची धमकीही तिला दिल्याचं तरूणीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. सुनील प्रयागराजचा रहिवासी असून पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेत पुढील तपास करत आहेत.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *