माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला, दगडफेक, तोडफोड करत घरासह आजूबाजूच्या दुकानांना आग लावली

माजी-मुख्यमंत्र्यांच्या-घरावर-हल्ला,-दगडफेक,-तोडफोड-करत-घरासह-आजूबाजूच्या-दुकानांना-आग-लावली

बिप्लब देवब यांचे वडील दिवंगत हिरुधन देब यांच्या पुण्यतिथी निमित्ताने राज्यातील आणि राज्याबाहेरच्या संतांच्या उपस्थितीत पूजा होणार होती. त्याची तयारी सुरू होती.

माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला, दगडफेक, तोडफोड करत घरासह आजूबाजूच्या दुकानांना आग लावली

माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला, दगडफेक, तोडफोड करत घरासह आजूबाजूच्या दुकानांना आग लावली

Image Credit source: tv9 marathi

आगरतळा: त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्या वडिलोपोर्जित घरावर हल्ला करण्यात आला आहे. गोमती जिल्ह्यातील उदयपूरच्या जमजुरी येथे देब यांचं घर असून या घरावर काही लोकांनी हल्ला केला. घरावर दगडफेक केल्यानंतर खिडक्यांच्या काचा फोडल्या. त्यानंतर घराला आग लावली. त्यानंतर आजूबाजूंच्या घरांनाही आग लावत दुकानेही पेटवून दिली. त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला जात असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

आज 4 जानेवारी रोजी बिप्लब देब यांच्या वडिलांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे देब हे आपल्या घरात हवन करणार होते. पुण्यतिथीच्या एक दिवस आधीच त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. यामागे सीपीएमचं षडयंत्र असल्याचं सांगितलं जात असून विशिष्ट समुदायाच्या लोकांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे.

माकपाच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले आमदार रतन भौमिक यांनी मंगळवारी या परिसरात एक बैठक घेतली होती. त्यानंतर संध्याकाळी हा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.

#BreakingNews : त्रिपुरा के पूर्व सीएम बिप्लव देव के घर पर हमला@preetiraghunand | @Ravi_Jounalist | #BiplabDeb pic.twitter.com/LFBnu6YXmt

— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) January 3, 2023

बिप्लब देवब यांचे वडील दिवंगत हिरुधन देब यांच्या पुण्यतिथी निमित्ताने राज्यातील आणि राज्याबाहेरच्या संतांच्या उपस्थितीत पूजा होणार होती. त्याची तयारी सुरू होती. त्याचवेळी काही समाजकंटकांनी हा हल्ला केला. एका विशिष्ट समुदायाने देब यांच्या घराबाहेरची गाडी आणि बाईकवर हल्ला करून आग लावली.

तसेच तोडफोड करत घराच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. त्यानंतर या समाजकंटकांनी आजूबाजूच्या दुकाने आणि घरांनाही आग लावून पळ काढला. सुदैवाने त्यावेळी देब यांच्या कुटुंबातील कोणीच घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *