मांजराच्या मृत्यूनंतर महिलेनं डॉक्टरला केली मारहाण, पुण्यातील प्रकार चर्चेत

मांजराच्या-मृत्यूनंतर-महिलेनं-डॉक्टरला-केली-मारहाण,-पुण्यातील-प्रकार-चर्चेत

मांजराच्या मृत्यूनंतर महिलेनं डॉक्टरला केली मारहाण, पुण्यातील प्रकार चर्चेत

मांजराच्या मृत्यूनंतर महिलेनं तिचा पती आणि मुलाला क्लिनिकमध्ये बोलावलं तसंच डॉक्टरांना मांजराचा मृत्यू कसा काय झाला? असा जाब विचारला.

मांजराच्या मृत्यूनंतर महिलेनं तिचा पती आणि मुलाला क्लिनिकमध्ये बोलावलं तसंच डॉक्टरांना मांजराचा मृत्यू कसा काय झाला? असा जाब विचारला.

मांजराच्या मृत्यूनंतर महिलेनं तिचा पती आणि मुलाला क्लिनिकमध्ये बोलावलं तसंच डॉक्टरांना मांजराचा मृत्यू कसा काय झाला? असा जाब विचारला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Yadav

पुणे, 15 डिसेंबर : पाळीव मांजराच्या मृत्यूनंतर रागावलेल्या मालकाने पशुवैद्यकीय डॉक्टरला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. हडपसर परिसरातील एका महिलेने डॉग अँड कॅट क्लिनिकमध्ये मांजराला उपचारासाठी आणले होते. तेव्हा उपचारावेळी मांजराचा मृत्यू झाला होता. यानंतर महिलेसह पाच जणांनी क्लिनिकमधील डॉक्टरला बेदम मारहाण केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोपी महिलेचं मांजर दोन दिवस आजारी पडले होते. मांजर अन्न खात नव्हते तसंच पाणीही पीत नव्हते. त्यामुळे महिलेनं मांजराला उपचारासाठी डॉक्टर रामनाथ ढगे यांच्या क्लिनिकमध्ये आणलं होतं. मांजरावर उपचार केले पण त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा : छत्रपती संभाजीराजेंच्या राज्याभिषेकाचा उल्लेखच नाही, अखेर कालनिर्णयचं स्पष्टीकरण

मांजराच्या मृत्यूनंतर महिलेनं तिचा पती आणि मुलाला क्लिनिकमध्ये बोलावलं तसंच डॉक्टरांना मांजराचा मृत्यू कसा काय झाला? असा जाब विचारला. यावरून वाद झाल्यानंतर प्रकरण मारहाणीपर्यंत गेलं. महिलेसह पाच जणांनी डॉक्टर ढगे यांना मारहाण केली.

हेही वाचा : निवडणुकीत चुलतभावाविरोधात पत्नीला केलं उभं, पण प्रचारावेळी पतीचा मृत्यू

डॉक्टर ढगे यांना १० डिसेंबर रोजी मारहाण झाली. यामध्ये डॉक्टर ढगे यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मारहाणीनतंर आरोपी फरार झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला असून मारहाण प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Crime, Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *