महेश कोठारे यांचं आत्मचरित्र होणार प्रकाशित ; सासऱ्यांसाठी उर्मिलाची खास पोस्ट

मुंबई, 3 जानेवारी : अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने तिचे सासरे डॅम इट किंग” rel=”noopener noreferrer nofollow” target=”_blank”> महेश कोठारे यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक महेश कोठारे ह्यांच्यासाठी खास पोस्ट करण्यामागे निमित्त देखील तितकेच खास आहे. ज्या नावानं त्यांना लोक ओळखतात त्या नावाने त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित होत आहे. ‘डॅम इट आणि बरंच काही’ आत्मचरित्रात महेश कोठारे यांच्या आयुष्याचा लेखाजोखा चाहत्यांना पुस्तकरूपाने अनुभवायला मिळणार आहे.
अभिनेत्री उर्मिला कोठारेने इन्स्टा पोस्ट करत या पुस्तकाबद्दल माहिती दिली आहे. सोबत तिनं पुस्तकाचा कव्हर फोटो देखील शेअर केला आहे. तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 2023 हे वर्ष आमच्यासाठी अतिशय खास गोष्टीने सुरू होणार आहे. आमची प्रेरणा, आमची ताकद आणि आमचा उर्जेचा एकमात्र स्त्रोत ज्यावर आमच्या संपूर्ण टीम चं इंजिन धावतं..श्री महेश कोठारे यांनी त्यांच्या टीम आणि कुटुंबाच्या खूप समजावणी नंतर अखेर त्यांचा जीवनपट कागदावर उतरवण्यास तयारी दाखवली आहे…आणि आता आम्ही तुमच्यासमोर आमच्या आयुष्यातील सर्वात पवित्र दस्तऐवज घेऊन येत आहोत – श्री महेश कोठारे यांचे आत्मचरित्र “डॅम इट आणि बरच काही” पुस्तक प्रकाशन 11 जानेवारी 2023 रोजी आहे.
वाचा : ‘क्राईम पेट्रोल’मध्ये दाखविण्यात आला श्रद्धा वालकर मर्डर केस?नव्या एपिसोडने खळबळ
बालकलाकार ते अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि मालिका निर्माता म्हणून महेश कोठारे यांनी काम केले आहे. छोटा जवान, राजा और रंक मधुन त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. पुढे जाऊन त्यांनी मराठी चित्रपटातून नायकाच्या तर कधी सहाय्यक अभिनेता म्हणून काम केलं. त्यानंतर दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले. या सर्व क्षेत्रात त्यांचे काम उल्लेखनिय असंच आहे. त्यांचा हाच जीवनपट या पुस्तकातून सर्वांना अनुभवता येणार आहे.आयुष्याच्या प्रवासात कौटुंबिय जबाबदारी, मराठी चित्रपट सृष्टीचा पडता काळ, चित्रपट निर्मितीमधून मिळालेले अनपेक्षित वळण तसेच लाडक्या लक्ष्यासोबतच्या आठवणींना दिलेला उजाळा पाहायला मिळणार आहे.
अभिनेत्री उर्मिला सोशल मीडिया नेहमीच सक्रीय असते. ती तिचे काही फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिची लाडकी लेक जिजा हिचे देखील गोड व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. जिजाचा देखाल सोेशल मीडियार एक वेगळा चाहता वर्ग आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.