महाविकास आघाडीचा आजचा मोर्चा कसा होता, देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाप्रमाणे मोर्चाही…

महाविकास-आघाडीचा-आजचा-मोर्चा-कसा-होता,-देवेंद्र-फडणवीस-म्हणाले,-उद्धव-ठाकरे-यांच्या-पक्षाप्रमाणे-मोर्चाही…

या मोर्चाचं कुठलं विराट स्वरुप उद्धव ठाकरे यांना दिसलं ते माहिती नाही. जसा त्यांचा पक्ष नॅनो होत आहे, तसा त्यांचा मोर्चाही नॅनोच होत आहे.

मुंबई : महामोर्चातून महाविकास आघाडीचं शक्तिप्रदर्शन आणि हल्लाबोलही पाहायला मिळालं आहे. सत्तांतरानंतर ठाकरे, पवार, पटोले यांच्यासह प्रमुख नेते रस्त्यावर उतरले. बऱ्याच वर्षानंतर एवढा मोठा मोर्चा देशानं पाहिला, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तर, ठाकरे यांच्या पक्षाप्रमाणे मोर्चाही नॅनो होता, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. उद्धव ठाकरे म्हणाले, मोर्चाची घोषणा केली. तेव्हा काही जणांना मला विचारलं तुम्ही चालणार का. माझ्याबरोबर महाराष्ट्र प्रेमी चालले. नुकते चाललेच नाही तर महाराष्ट्रद्रोहींच्या छाताडावर चालणार आहेत. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हिच वेळ असल्याचं त्यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, तीन पक्ष एकत्र येऊन एवढा लहानसा मोर्चा निघाला. आज तुम्ही कुणीही द्रोण शॉट नाही दाखवू शकलात. आज क्लोज अप दाखवावे लागले. ड्रोन शॉट लायक मोर्चाचं नव्हता. आम्हाला हे आधीच माहिती होते. आम्ही त्यांना विनंती केली होती की, आझाद मैदानावर या.

पण, आझाद मैदानाएवढी संख्या राहणार नाही. हे माहीत नसल्यामुळं जिथं रस्ता लहान होतो, अशी जागा त्यांनी निवडली. या मोर्चाचं कुठलं विराट स्वरुप उद्धव ठाकरे यांना दिसलं ते माहिती नाही. जसा त्यांचा पक्ष नॅनो होत आहे, तसा त्यांचा मोर्चाही नॅनोच होत आहे.

संजय राऊत वल्गना करत होते की, या मोर्चानं महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना डिसमीस केलंय. शिंदे-फडणवीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा इशारा या मोर्चानं दिला असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. सरकार उलथवून टाकण्यासाठी टाकलेलं पाहिलं पाऊल म्हणजे हा मोर्चा असल्याचंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *