Home » महाराष्ट्र » राजधानीत कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता; महाराष्ट्रात काय स्थिती?

राजधानीत कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता; महाराष्ट्रात काय स्थिती?

राजधानीत-कोरोना-रुग्णसंख्येत-वाढ,-पुन्हा-निर्बंध-लागण्याची-शक्यता;-महाराष्ट्रात-काय-स्थिती?

DDMA ची ही महत्त्वपूर्ण बैठक पुढील आठवड्यात बुधवारी होणार आहे. लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीत आरोग्य मंत्री सतेंद्र जैन, दिल्लीचे पोलीस आयुक्त, मुख्य सचिव विजय देव यांच्यासह महसूल मंत्री कैलाश गेहलोत, NITI आयोगाचे सदस्य व्हीके पॉल हे देखील उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन दिल्ली सरकारनेही अनेक गोष्टींची तयारी केली आहे. राजधानीतील सर्व रुग्णालयांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमध्ये खाटांची कमतरता पडू नये यासाठी 65 हजार अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच लसीकरण मोहीम आणखी तीव्र करण्याचाही सरकार विचार करत आहे. सरकारी रुग्णालयात कोरोना लसीचा बूस्टर डोस दिला जाऊ शकतो. सरकार हा बूस्टर डोस मोफत देण्याचा विचार करत आहे.

1 thought on “राजधानीत कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता; महाराष्ट्रात काय स्थिती?

Leave a Reply

Your email address will not be published.