Home » महाराष्ट्र » वरात येताच लोक विचारू लागले, “मासे खाणार की गोळी?” मग काय झालं पाहा VIRAL VIDEO

वरात येताच लोक विचारू लागले, “मासे खाणार की गोळी?” मग काय झालं पाहा VIRAL VIDEO

वरात-येताच-लोक-विचारू-लागले,-“मासे-खाणार-की-गोळी?”-मग-काय-झालं-पाहा-viral-video

लग्नासाठी आलेल्या पाहूण्यांचा गावकऱ्यांनी पाठलाग करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत लहान मुले व वृद्धांसह बरीच लोक गंभीर जखमी झाले.

लग्नासाठी आलेल्या पाहूण्यांचा गावकऱ्यांनी पाठलाग करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत लहान मुले व वृद्धांसह बरीच लोक गंभीर जखमी झाले. लग्नसोहळ्यात आनंदाच्या भरात गोळीबार करण्यात आल्याचं सांगण्यात येत असून, याला विरोध केल्याने गोंधळ सुरू झाला. हा विरोध बघता बघता हाणामारीत रूपांतरीत झाला.

वरातीत अचानक गोळीबारचा आवाज ऐकल्यानंतर इथल्या लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी गावाबाहेर पळू लागले. मात्र रात्रीच्या अंधारात मक्याच्या शेतात लपलेल्या गावकऱ्यांना अक्षरशः ओढत नेऊन त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना बिहारमधल्या बेगूसराय मधील चौराही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. नरेश साहनी यांच्या मुलाचे लग्न झाल्याचे पीडितेने सांगितले. याच विवाह सोहळ्याला उपस्थित राहून ग्रामस्थ बेगुसरायच्या नवकोठी गावातून चौराही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पानसल्ला गावात वरातीसाठी गेले होते.

आणखी वाचा : “भाऊ, मला पाच किलो पीठ दे…” असं रडत रडत म्हणाला आणि एका रात्रीत नशीब पालटलं, पाहा हा VIRAL VIDEO

त्यांनी सांगितले की, लग्नात जेवण सुरू असताना पानसल्ला ग्रामस्थांनी आनंदात गोळीबार सुरू केला. यावर वरातीत आपल्या पाहूण्यांनी आक्षेप घेतला आणि गोळीबार न करण्यास सांगितले. यावर ग्रामस्थ संतापले आणि त्यांनी लहान मुलाच्या छातीवर बंदूक रोखली. “तू मासे खाशील की गोळी, वीट खाशील की बांबू खाणार” अशी विचारणा करू लागले. जेव्हा पीडितेच्या वडिलांनी त्यांना अडवले आणि गोळी झाडली तर आपला मुलगा मरेल अशी कैफियत त्यांच्यासमोर मांडली. तेवढ्यात बदमाशांना राग आला आणि त्यांनी तांडव सुरू केला.

आणखी वाचा : खोलीत महाकाय अजगराशी खेळत होती चिमुरडी, VIRAL VIDEO पाहून सारेच जण हैराण

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अनोखी मैत्री! इवल्याश्या मैनेची लहान मुलीसोबत जमली गट्टी, एकत्र राहण्याचा केला हट्ट, पाहा VIRAL VIDEO

गावकऱ्यांचा तांडव फक्त इथेच संपला नाही. या बदमाशांनी आधी लग्न मंडपाची विजेचं कनेक्शन लाईन कापली आणि अंधारात खुर्च्या, काठ्यांनी आणि हत्यारांनी मारहाण सुरू केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या घटनेनंतर वरातीत आलेल्या पाहूण्यांनी रात्रीच्या अंधारात पळ काढला आणि घरी परतले. त्याचवेळी, सर्व जखमींना बेगुसरायच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, तेथे अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्याचवेळी या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरही व्हायरल होऊ लागल्याची माहिती आहे.

Web Title: Bihar video google trends today trending news baraat thrashed brutally by many people see what happened next prp

Leave a Reply

Your email address will not be published.