Home » महाराष्ट्र » ‘मैं झुकेगा नहीं… पाकिस्तानचा फैसला रविवारी होणार’, इमरान खान असं का म्हणाले?

‘मैं झुकेगा नहीं… पाकिस्तानचा फैसला रविवारी होणार’, इमरान खान असं का म्हणाले?

‘मैं-झुकेगा-नहीं…-पाकिस्तानचा-फैसला-रविवारी-होणार’,-इमरान-खान-असं-का-म्हणाले?

‘अमेरिकेला माझ्याबाबत असूया’

इमरान खान म्हणाले की, अमेरिकेला मी इथे पंतप्रधान असल्याने अडचण होत आहे, इतर पक्ष किंवा नेत्यांशी नाही. अमेरिकेने संबंध संपवण्याची धमकी दिली. इथल्या लोकांसोबत बाहेरच्या लोकांनी आमचे सरकार पाडण्याचा कट रचला. रशियाला जाण्याचा निर्णय आमचा एकट्याचा नाही. मी रशियात गेल्याचा अमेरिकेला राग आहे.’

देश अधोगतीकडे जाताना आम्ही पाहिला: इमरान

पाकिस्तानच्या जनतेला संबोधित करताना इमरान खान म्हणाले की, ‘त्यांनी देशाची अधोगती पाहिली आहे. वॉर ऑन टेररवर पाकिस्तानची कोंडी झाली होती. पाकिस्तान विदेशी शक्तींसमोर मुंग्यांसारखा रेंगाळत आहे. आमचे परराष्ट्र धोरण मुक्त असेल, त्याचा फायदा पाकिस्तानला होईल, मला सर्व देश माहीत आहेत. मी कोणत्याही देशाच्या विरोधात असू शकत नाही.’

Leave a Reply

Your email address will not be published.