Home » महाराष्ट्र » बंडातात्या कराडकर यांचं महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य, नव्या वादाला तोंड फुटणार?

बंडातात्या कराडकर यांचं महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य, नव्या वादाला तोंड फुटणार?

बंडातात्या-कराडकर-यांचं-महात्मा-गांधींबाबत-वादग्रस्त-वक्तव्य,-नव्या-वादाला-तोंड-फुटणार?

बंडातात्या कराकडर असंही म्हणाले की भगतसिंग यांना हे कळून चुकलं की या म्हाताऱ्याच्या मार्गाने जायचं नाही. त्यानंतर ते क्रांतिकारक बनले. 1947 ला मिळालेलं स्वातंत्र्य हे अहिंसेच्या मार्गाने मिळालेलं नाही. 1942 ला जी क्रांतिकारक चळवळ उभी राहिली, चले जाओ, क्विट इंडिया या सगळ्यामुळे मिळालं आहे. या चळवळीत पोलिसांची कार्यालयं पेटवणं, सरकारी कार्यालयं पेटवणं, रेल्वे रूळ उखडणे या घटना घडल्या. ज्यामुळे इंग्रजांना समजलं की आपल्याला देश सोडण्यावाचून आता पर्याय नाही.

3 फेब्रुवारीलाही बंडातात्या कराडकर यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी बोलत असताना बंडातात्या कराडकर यांनी नेत्यांची मुलं रस्त्यावर दारू पिऊन पडत असल्याचे पुरावे आहेत असं म्हटलं होतं. सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे दारू पितात. नेत्यांची मुलं दारू पिऊन रस्त्यावर पडतात असं म्हटलं होतं. त्यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली. एवढंच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवारांची जोडी म्हणजे ढवळ्याशेजारी पोवळा बांधला वाण नाही पण गुण लागला अशी आहे असं म्हणत सरकारवरही टीका केली होती. यावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed