पद्म पुरस्कार: मोदींसमोर दंडवत… पीएम देखील नतमस्तक, 126 वर्षीय स्वामी शिवानंद यांचा Video व्हायरल

पद्म पुरस्कार प्राप्त करण्यापूर्वी स्वामी शिवानंद हे पंतप्रधान मोदींसमोर नतमस्तक झाले. पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी स्वामी शिवानंद यांनी गुडघे टेकून पंतप्रधान मोदींना अभिवादन केले. शिवानंद यांचे हे भाव पाहून पीएम मोदीही आपल्या खुर्चीवरून उठले आणि शिवानंद यांच्यासमोर नतमस्तक झाले.
पंतप्रधान मोदींना अभिवादन केल्यानंतर स्वामी शिवानंद यांनी पद्म पुरस्कार प्राप्त करण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोरही गुडघे टेकले. स्वामी शिवानंदांना आपल्यासमोर नतमस्तक झालेले पाहून राष्ट्रपती कोविंद पुढे आले आणि त्यांनी त्यांना स्वत: हाताला धरुन उभं केलं.