Home » महाराष्ट्र » ‘लोकसभेसाठी पवारांनी 24 तास पावसात भिजावं’, मुनगंटीवारांची खोचक टीका

‘लोकसभेसाठी पवारांनी 24 तास पावसात भिजावं’, मुनगंटीवारांची खोचक टीका

‘लोकसभेसाठी-पवारांनी-24-तास-पावसात-भिजावं’,-मुनगंटीवारांची-खोचक-टीका

मनीष जोग, जळगाव: महाराष्ट्रातील 2019 सालची विधानसभा निवडणूक ही पुढील अनेक वर्ष विविध कारणांसाठी लक्षात ठेवली जाईल. कारण या निवडणुकीनंतर सर्वार्थानं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साताऱ्यातील पावसातील सभा (Sharad Pawar Rain Public Meeting) ही प्रचंड गाजली होती. याच सभेमुळे अवघ्या महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकीय वातावरण बदलून गेलं होतं असंही आता बोललं जातं. पण आता याच सभेवरुन भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)यांनी आता पवारांवर टीका केली आहे.

‘2019 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शंभरीसुद्धा गाठता आली नाही. आता ते सांगतायेत पावसात भिजले आणि आमची सत्ता आली. मग उद्या लोकसभेची सत्ता आणण्यासाठी 24 तास पावसात भिजा.’ अशी खोचक टीका मुनगंटीवार यांनी केली आहे. सुधीर मुनगुंटीवार हे गिरीश महाजन यांच्या घरी असलेल्या एका लग्न सोहळ्याला आले होते. तेव्हा माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक विषयावरुन महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

‘लोकसभेची सत्ता आणण्यासाठी 24 तास पावसात भिजा’

‘आघाडी तोडण्यासाठी आम्हाला कधीच प्रयत्न करण्याची गरज नव्हती. जनतेने आम्हाला निवडून दिलं. 2 कोटी 30 लाख मतं आम्हाला दिली. 161 आमदार आमचे निवडून आले. पण बेईमानी झाली. त्यामुळे इतिहास साक्षीदार आहे. असे बेईमानी करणारे असे बेईमान लोक आपण पाहिले आहेत. जनतेने निवडून दिलं होतं. काँग्रेसला झटका 44, राष्ट्रवादीला फटका 54 त्यामुळे शंभरच्या आत होते. शंभरीसुद्धा गाठता आली नाही. आता ते सांगतायेत पावसात भिजले आणि आमची सत्ता आली. मग उद्या लोकसभेची सत्ता आणण्यासाठी 24 तास पावसात भिजा.’

‘संभाजीनगर नाव ठेवून दाखवाच’

‘तुम्ही एमआयएमला खुश ठेवण्यासाठी आणि खुश करण्यासाठी तुम्ही औरंगाबादचं नाव बदलविण्यास तयार नाहीत. जेव्हा भाजप-शिवसेनेचं सरकार होतं तेव्हा आम्ही 2015, 2016 साली सगळे प्रस्ताव तयार केले. आता तो शेवटचा प्रस्ताव मंत्रिमंडळासाठी आहे. काही लोकं विचारतात तुम्ही काय केलं. खरं म्हणजे यासाठी प्रत्येक विभागाची यासाठी एनओसी घ्यावी लागते. आम्ही सर्व एनओसी घेऊन ठेवल्या आहेत. आमचं सरकार आल्यानंतर हे या टर्ममध्ये करण्याचं ठरवलं होतं. आता प्रस्ताव तयार आहे कॅबिनेटचा. जर खरंच MIM च्या विरोधात असाल तर हा संभाजीनगरचा प्रस्ताव मांडाल. पण तुम्हाला MIM चं तुष्टीकरण करायचं आहे म्हणून तुम्ही संभाजीनगर करत नाही.’

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान तुम्ही सहन करता!

‘संभाजीनगर करण्याची सिंहगर्जना करणारे कुठे गेले. 1988 मध्ये बाळासाहेबांनी सांगितलेलं की, हे माझं वचन आहे. कुठे गेलं ते वचन? शरजील उस्मानी येतो हिंदू हे सडकी लोकं आहेत असं म्हणतो कुठे गेलं हे सगळं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात अतिशय नीच शब्दांचा उपयोग होतो जो सामान्य कोणीही बुद्धीवादी व्यक्ती वापरणार नाही त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान तुम्ही सहन करता.’

‘आज देशात ‘काश्मीर फाईल्स’बद्दल मी स्वत: 92 आमदारांचे हस्ताक्षर करुन स्टेट जीएसटीमध्ये सूट द्यावी अशी मागणी केली होती. तुम्ही त्याला वाटाण्याच्या अक्षता लावता.’

‘एकदा काँग्रेसच्या नेत्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर जय म्हणायला सांगा. जे घाणेरडं पुस्तक लिहलं त्याच्यावर बंदी टाकायला आणि देशाची माफी मागायला सांगा. तुम्ही नवाब मलिकाच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेत नाही का? तुष्टीकरणासाठी… नवाब मलिक मंत्री नसेल तर राज्याची साडेबारा कोटी जनता काय उपाशी झोपणार आहे?’

‘तुम्ही त्यांची खाती काढली. पण जनतेच्या पैशातून त्यांचा पगार त्यांच्या स्टाफचा पगार सुरु आहे. म्हणजे जनतेने कशासाठी कर द्यायचा.’ असं म्हणत मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed