..तेव्हा स्वाभिमान झुकला नाही का? जनाब ठाकरे म्हणून डिवचणाऱ्या फडणवीसांना सेनेचं प्रत्युत्तर

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यावर सावध प्रतिक्रीया देत या प्रस्तावावर विचार करण्याची तयारी दाखवली आहे, तर शिवसेनेने मात्र एमआयएमशी युतीला नकार दिला आहे.
एमआयएमने युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर शिवसेना नेतृत्वाला जनाब ठाकरे म्हणून डिवचणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना शिवसेनेनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेनेच्या विधानपरिषदेच्या आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीसांचा एका कार्यक्रमातला फोटो पोस्ट करत ज्यात फडणवीसांच्या नावासमोर जनाब असं लिहीलं आहे. हा फोटो पोस्ट करत मनिषा कायंदे यांनी चादर चढवताना स्वाभिमान झुकला नाही का? असा बोचरा प्रश्न विचारला आहे.
à¤à¤¨à¤¾à¤¬ @Dev_Fadnavis à¤à¥, तà¥à¤µà¥à¤¹à¤¾ तà¥à¤®à¥à¤¹à¥ #à¤à¤¨à¤¾à¤¬ शबà¥à¤¦à¤¾à¤¬à¤¦à¥à¤¦à¤² à¤à¤à¥à¤·à¥à¤ª à¤à¥à¤¤à¤²à¥à¤¯à¤¾à¤à¥ à¤à¤ वत नाहà¥. à¤à¤¾à¤¦à¤° à¤à¤¢à¤µà¤¤à¤¾à¤à¤¨à¤¾ à¤à¤ªà¤²à¤¾ सà¥à¤µà¤¾à¤à¤¿à¤®à¤¾à¤¨ वाà¤à¤²à¤¾/à¤à¥à¤à¤²à¤¾ नाहॠà¤à¤¾? à¤à¤¤à¤¾à¤ à¤à¤¾ या शबà¥à¤¦à¤¾à¤¬à¤¦à¥à¤¦à¤² à¤à¤µà¤¢à¤¾ राà¤? ठरॠहà¥, 105 à¤à¤®à¤¦à¤¾à¤° निवडà¥à¤¨à¤¹à¥ @BJP4Maharashtra सतà¥à¤¤à¥à¤¤ नाहà¥, यामà¥à¤³à¥ तà¥à¤®à¤à¥ ठसà¥à¤µà¤¸à¥à¤¥à¤¤à¤¾ à¤à¤¹à¥. नाहॠà¤à¤¾?@ShivsenaComms #BJP pic.twitter.com/tn0j6rWZwp
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) March 20, 2022
“जनाब देवेंद्र फडणवीसजी, तेव्हा तुम्ही जनाब शब्दाबद्दल आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. चादर चढवताना आपला स्वाभिमान वाकला/झुकला नाही का? आताच का या शब्दाबद्दल एवढा राग? अरे हो, १०५ आमदार निवडूनही भाजपा सत्तेत नाही, यामुळे तुमची अस्वस्थता आहे. नाही का?,” अशी टीका मनिषा कायंदे यांनी केली आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
“आम्ही पाहतो आहोत की सत्तेसाठी ते आणखी काय करतात? तसंही आता शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्विकारलेलं आहे आणि अजानची स्पर्धा वैगरे सुरू आहे, त्याचा परिणाम आहे का पाहूयात,” असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता.
दरम्यान, आज शिवसेना भवनावर पार पडलेल्या शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानातही शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएमच्या प्रस्तावाबाबत आपली प्रतिक्रीया दिली आहे. “शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून एमआयएमचा कट उधळून लावा. मेहबुबा मुफ्ती विसरु नका. एक वेळ अशी होती की, ते मुफ्तीसोबत संसार करत होते, आता ते आपल्याला बोलत आहेत. आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत, महाविकास आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.