Home » महाराष्ट्र » मुंबई : पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी का आहेत फरार?; काय आहे अंगाडिया प्रकरण?

मुंबई : पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी का आहेत फरार?; काय आहे अंगाडिया प्रकरण?

मुंबई-:-पोलीस-उपायुक्त-सौरभ-त्रिपाठी-का-आहेत-फरार?;-काय-आहे-अंगाडिया-प्रकरण?

काय आहे अंगडिया प्रकरण?

रोख रक्कम, सोनं-चांदी यासह हिरे आदी गोष्टी एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणाऱ्या मुंबईतील अंगडिया असोसिएशनने मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पोलीस अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी करत त्रास दिला जात असल्याची तक्रार केली होती. खंडणी मागितली जात असल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर दक्षिण मुंबई विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी १८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल गेला होता.

त्रिपाठी कसे अडकले?

या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर अटक करण्यात आली. यात पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांच्यासह पोलीस अधिकारी नितीन कदम आणि समाधान जमदाडे यांचा समावेश आहे. दरम्यान, या खंडणीच्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागाकडे देण्यात आला. पोलीस तपासातून पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचं नावं समोर आलं.

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed