Home » Uncategorized » दापोलीच्या वणोशीत तीन वृद्ध महिलांचा संशयास्पद मृत्यू, अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

दापोलीच्या वणोशीत तीन वृद्ध महिलांचा संशयास्पद मृत्यू, अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

दापोलीच्या-वणोशीत-तीन-वृद्ध-महिलांचा-संशयास्पद-मृत्यू,-अर्धवट-जळालेल्या-अवस्थेत-आढळले-मृतदेह

राकेश गुडेकर, प्रतिनिधी, दापोली

दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे एकाच घरातील तीन वृद्ध महिलांचा जळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ माजली असून, दापोली पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. दापोली पालगड रोडवरील वणोशी या गावामध्ये खोतवाडी आहे.  या वाडी मध्ये सुमारे पस्तीस घरे आहेत. यातील बहुतांशी घरे ही बंद अवस्थेत आहेत.

या ठिकाणी असलेले बहुतांश ग्रामस्थ हे कामा धंद्यानिमित्त मुंबईत स्थलांतरित झालेले आहेत, त्यामुळे गावांमध्ये केवळ चार ते पाच कुटुंबच वास्तव्याला आहेत. गावातच एका घरामध्ये सत्यवती पाटणे (वय- 75), पार्वती पाटणे (वय – 90) या वृद्ध महिला राहत होत्या त्यांच्या समोरच्या घरात त्यांच्या नातेवाईक इंदुबाई  पाटणे (वय – 85) या राहायला होत्या. सध्या दापोलीत थंडीचे दिवस असल्याने त्या घराची दारं खिडक्या बंद करून राहत असत, मात्र दररोज सकाळी त्या उन्हामध्ये बसत असत. त्यांच्या घराच्यासमोर त्यांचे कुलदैवतेचं मंदिर आहे. तेथे पूजा करण्याकरिता विनायक पाटणे हे दररोज सकाळी येतात त्यांना शुक्रवारी सकाळी या महिला बाहेर उन्हामध्ये बसलेल्या दिसल्या नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *