Home » महाराष्ट्र » CDS Bipin Rawat : देशातले पहिले CDS बिपिन रावत यांच्याबाबत माहिती आहे का?

CDS Bipin Rawat : देशातले पहिले CDS बिपिन रावत यांच्याबाबत माहिती आहे का?

cds-bipin-rawat-:-देशातले-पहिले-cds-बिपिन-रावत-यांच्याबाबत-माहिती-आहे-का?

बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला तामिळनाडूमध्ये अपघात झाला आहे. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. जे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं त्यामध्ये बिपीन रावत यांच्या पत्नीही होत्या. CDS बिपीन रावत यांच्यानावापुढे जे CDS हे पद लागलं आहे त्या पदावर बसणारे ते पहिलेच अधिकारी आहेत. CDS म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्यात समन्वय साधणं हे त्यांचं प्रमुख काम आहे. एवढंच नाही तर संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी एक नाव बिपीन रावत हेच आहे.

cds bipin rawat is an expert in battle at heights his 10 great features

cds bipin rawat is an expert in battle at heights his 10 great features(फाइल फोटो)

कोण आहेत बिपीन रावत?

बिपीन रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 ला देहरादून या ठिकाणी झाला. त्यांचे वडील एलएस रावत हेदेखील भारतीय लष्करात होते. त्यांना लेफ्टनंट जनरल एलएस रावत म्हणून ओळखलं जातं. बिपीन रावत यांचं बालपण सैनिकांमध्ये गेलं. प्राथमिक शिक्षण शिमला येथील एडवर्ड स्कूल मध्ये झालं. त्यानंतर त्यांनी भारतीयल लष्कर अकादमीमध्ये प्रवेश घेतला त्यासाठी ते देहरादूनला गेले. तिथे त्यांची कामगिरी पाहून त्यांना Sword of Honour ने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतलं. तिथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ महाविद्यालयात पदवी घेतली आणि हायकमांडचा कोर्सही केला.

बिपीन रावत अमेरिकेहून परत आले त्यानंतर त्यांनी सैन्य दलात भरती होण्याचा निर्णय घेतला. 1978 मध्ये त्यांना 11 गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनमध्ये सहभागी करून घेण्यात आलं. ज्यानंतर त्यांची लष्करी कारकीर्द सुरू झाली. राव यांना सैन्यदलाचे अनेक नियम शिकण्यास मिळाले. गोरखामध्ये राहून जे मी शिकलो ते इतर कुठे शिकता आलं असतं असं वाटत नाही असं रावत यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. लष्कराच्या अनेक पदांवर क्रॉप्स, जीओसी-सी, दक्षिण कमांड, आयएमए देहरादून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर अशा विविध पदांवर काम केलं.

सैन्यात असताना बिपिन रावत यांना सैन्यात अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. लष्करात अनेक पदकं त्यांनी मिळवली आहेत. त्यांच्या सेवेत जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed