Home » महाराष्ट्र » CDS Bipin Rawat: पत्नीसोबत बिपिन रावत करत होते प्रवास, कोण-कोण होतं त्या हेलिकॉप्टरमध्ये?

CDS Bipin Rawat: पत्नीसोबत बिपिन रावत करत होते प्रवास, कोण-कोण होतं त्या हेलिकॉप्टरमध्ये?

cds-bipin-rawat:-पत्नीसोबत-बिपिन-रावत-करत-होते-प्रवास,-कोण-कोण-होतं-त्या-हेलिकॉप्टरमध्ये?

cds bipin rawat was traveling with his wife know who was present in the helicopter

कुन्नूर (तामिळनाडू): तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याचं वृत्त काही वेळापूर्वीच समोर आलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत हे उपस्थित होते. तामिळनाडूतील ज्या भागात बुधवारी हे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले तो भाग पूर्णपणे जंगली भाग आहे. हेलिकॉप्टर अपघातानंतर आजूबाजूला आग आणि धुराचे लोट उठत होते.

हे Mi-17V5 हेलिकॉप्टर होते, ज्यामध्ये CDS बिपिन रावत यांच्यासह एकूण 14 लोक होते. यापैकी चार जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. यापैकी तीन जणांना वाचवण्यात यश आले असून, सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या हेलिकॉप्टरमध्ये बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका रावतही होत्या. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये बिपिन रावत, त्यांची पत्नी, एक ब्रिगेडियर दर्जाचा अधिकारी, आणखी एक अधिकारी आणि दोन पायलट उपस्थित होते.

अपघातग्रस्त हॅलिकॉप्टरमध्ये कोण-कोण होत?

  • जनरल बिपीन रावत

  • मधुलिका रावत

  • ब्रिगेडियर एल. एस. लिडर

  • लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग

  • नाईक गुरुसेवक सिंग

  • नायक जिंतेंद्र कुमार

  • लान्स नायक विवेक कुमार

  • लान्स नायक बी. साईतेजा

  • हवालदार सतपाल

सीडीएस बिपिन रावत यांच्यासोबत दिल्ली ते सुलूर प्रवास करणाऱ्या लोकांची ही यादी आहे. मात्र, त्यावेळी या हेलिकॉप्टरमध्ये किती लोक होते याची अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही.

14 people were on-board the military chopper that crashed b/w Coimbatore&Sulur in Tamil Nadu. They included CDS Gen Bipin Rawat, his wife Madhulika Rawat, Brig LS Lidder, Lt Col Harjinder Singh, NK Gursewak Singh, NK Jitendra Kr, L/Naik Vivek Kumar, L/Naik B Sai Teja & Hav Satpal

— ANI (@ANI) December 8, 2021

या हेलिकॉप्टर दुर्घटनेतून आतापर्यंत तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार हा अपघात खराब हवामानामुळे झाला आहे. जखमींना आता जवळच्या लष्कराच्या वेलिंग्टन तळावर उपचारासाठी नेण्यात आले आहे.

या अपघाताबाबत हवाई दलाचे अधिकृत वक्तव्यही आले आहे. वायुसेनेच्या म्हणण्यानुसार, ज्या Mi-17V5 हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपिन रावत होते त्याचा कुन्नूरमध्ये अपघात झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed