Home » Uncategorized » BMW Fire : नवी मुंबईत 45 बीएमडब्ल्यू गाड्यांचा जळून कोळसा; अख्ख्या गोडाऊनची झाली राख

BMW Fire : नवी मुंबईत 45 बीएमडब्ल्यू गाड्यांचा जळून कोळसा; अख्ख्या गोडाऊनची झाली राख

bmw-fire-:-नवी-मुंबईत-45-बीएमडब्ल्यू-गाड्यांचा-जळून-कोळसा;-अख्ख्या-गोडाऊनची-झाली-राख

नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीत असलेल्या एका कारच्या गोडाऊनमध्ये आगीने तांडव घातलं. गोडाऊनमध्ये असलेल्या 40 ते 45 BMW गाड्यांचा जळून कोळसा झाला. कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं असून, आगीने रौद्रवतार घेतल्यानं विझवण्यासाठी तब्बल 6 तास लागले. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेलं नाही.

नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीमधील D-207 या BMW कार ठेवण्यात आलेल्या गोदामाला आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. आगीमध्ये गोदामात ठेवण्यात आलेल्या जवळपास 40 ते 45 BMW चे नवीन कार जाळून खाक झाल्या आहेत.

यामुळं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. आगीची माहिती मिळताच एमआयडीसी व महापालिकेच्या 10 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

चारही बाजूने गोदामात ठेवण्यात आलेल्या आलिशान कार पेटत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत होते. या भीषण अग्नितांडवात कंपनीचं गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झालं. अखेर सुमारे सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र, ही आग कशा मुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

गोदामाला कोणत्या कारणामुळं आग लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *