Home » Uncategorized » Corona RTPCR चाचणी 350 रूपयांमध्ये होणार, राज्य सरकारने पुन्हा एकदा घेतला दर कमी करण्याचा निर्णय

Corona RTPCR चाचणी 350 रूपयांमध्ये होणार, राज्य सरकारने पुन्हा एकदा घेतला दर कमी करण्याचा निर्णय

corona-rtpcr-चाचणी-350-रूपयांमध्ये-होणार,-राज्य-सरकारने-पुन्हा-एकदा-घेतला-दर-कमी-करण्याचा-निर्णय

कोरोना रुग्णांची संख्या वाढली (प्रातिनिधिक फोटो)

राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी करण्यात आले आहेत. राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात, देशात गेल्या दीड वर्षापासून खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या चाचण्यांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत किमान सहा वेळा या दरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. आता सुधारित दरांनुसार कोरोनाची चाचणी 350 रूपयांमध्ये होणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

आज घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आता कोरोना चाचणीसाठी 350, 500 आणि 700 रूपये दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरून नमुना घेऊन त्याची वाहतूक आणि अहवाल देणं या सगळ्यासाठी 350 रूपये आकारले जाणार. रूग्णालय, कोव्हिड केअर सेंटर, क्वांरटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथील नमुना तपासणी आणि अहवालासाठी 500 रूपये तर रूग्णाच्या निवासस्थानावरून नमुना घेऊन अहवाल देण्यासाठी 700 रूपये आकारले जाणार आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाहीत असं या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील कोरोना चाचणी

महाराष्ट्रातील कोरोना चाचणी (फोटो सौजन्य – India Today)

आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमुने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जाऊन नमुने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी 200, 250 आणि 350 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी 300, 400, 500असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास 100, 150 आणि 250असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *