Home » महाराष्ट्र » आईने दागिने विकून तयार केले Olympic चिन्हाचे कानातले, ५ वर्षांच्या मेहनतीनंतर Mirabai ने स्वप्न सत्यात उतरवलं

आईने दागिने विकून तयार केले Olympic चिन्हाचे कानातले, ५ वर्षांच्या मेहनतीनंतर Mirabai ने स्वप्न सत्यात उतरवलं

आईने-दागिने-विकून-तयार-केले-olympic-चिन्हाचे-कानातले,-५-वर्षांच्या-मेहनतीनंतर-mirabai-ने-स्वप्न-सत्यात-उतरवलं

मणिपूरची वेटलिफ्टर मीराबाई चानू टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवसाची हिरो ठरली. ४८ किलो वजनी गटात मीराबाईने २०२ किलो वजन उचलत रौप्यपदकाची कमाई केली. या कामगिरीनंतर सर्व स्तरातून मीराबाईचं कौतुक होतंय. २०१६ साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्येही मीराबाई सहभागी झाली होती. परंतू तिकडे पदक मिळवण्यात मीराबाईला अपयश आलं होतं.

शुक्रवारी पदकाची कमाई केल्यानंतर मीराबाईच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. यावेळी मीराबाईने घातलेले कानातले विशेषकरुन चमकत होते. मीराबाईच्या आईने आपले दागिने विकत मीराबाईला ऑलिम्पिकच्या चिन्हासारखे कानातले दिले होते. २०१६ साली आपली मुलगी पदक जिंकेल असा मीराबाईच्या आईला विश्वास होता. परंतू मागच्या स्पर्धेत ही संधी हुकली. परंतू मीराबाईने हार न मानता सराव आणि मेहनत सुरु ठेवत आपल्या आईचा विश्वास सार्थ ठरवून दाखवला.

मीराबाईच्या कामगिरीनंतर मणीपूरमध्ये तिच्या घरातल्यांचा आनंदही गगनात मावत नव्हता. मीराबाईच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले होते. पीटीआय सोबत बोलत असताना मीराबाईच्या आईने आपली प्रतिक्रीया दिली. “मी एकदा टिव्हीवर तशा प्रकारचे कानातले पाहिले होते. २०१६ रिओ ऑलिम्पिकदरम्यान मी तसे कानातले पाहिले होते. माझ्याकडे काही साठवलेलं सोनं होतं आणि बचतीमधल्या पैशांमधून मी तिला हे कानातले करुन दिले होते. मीराबाईच्या वडिलांच्या चेहऱ्यावरही यंदा आनंद दिसत होता.”

मीराबाईचा ऑलिम्पिक पदकापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. २०१६ साली रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतही मीराबाई सहभागी झाली होती. परंतू या स्पर्धेत तिला अपयश आलं. या अपयशानंतर मानसिकदृष्ट्या खचलेल्या मीराबाईने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतू तिच्या आईने तिला पाठींबा देत हा निर्णय घेण्यापासून थांबवलं. दरम्यान तब्बल २१ वर्षांनी मीराबाईने वेटलिफ्टींग प्रकारात भारताला पदकाची कमाई करुन दिली. याआधी २००० साली सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या कर्नम मल्लेश्वरीने वेटलिफ्टींगमध्ये पदक मिळवलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *