Home » महाराष्ट्र » Tokyo Olympic : सर आपलं स्वप्न पूर्ण झालं ! ऐतिहासिक कामगिरीनंतर Mirabai ने मानले कोचचे आभार

Tokyo Olympic : सर आपलं स्वप्न पूर्ण झालं ! ऐतिहासिक कामगिरीनंतर Mirabai ने मानले कोचचे आभार

tokyo-olympic-:-सर-आपलं-स्वप्न-पूर्ण-झालं-!-ऐतिहासिक-कामगिरीनंतर-mirabai-ने-मानले-कोचचे-आभार

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिल्याच दिवशी रौप्य पदकाची कमाई करुन देणाऱ्या मीराबाई चानूवर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. पाच वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची संधी गमावलेल्या मीराबाईसाठी हे पदक खूप महत्वाचं होतं. मीराबाईचे प्रशिक्षक विजय शर्मा यांनीही या कामगिरीबद्दल तिचं कौतुक केलंय.

“रिओ मध्ये आम्हाला जो धक्का बससा, त्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत येऊ शकलो. कोचची भूमिका ही महत्वाची असते. पण खेळाडू जर शिस्तीत राहणारा नसेल तर मग कोचही काही करु शकत नाही. या कामगिरीमागे मीराबाईची खूप मोठी मेहनत आहे. तीने खूप एकाग्र राहून सराव केला आणि याचचं फळ तिला मिळालं आहे.” शर्मा ANI शी बोलत होते.

मीराबाईने रौप्यपदकाची कमाई केली असली तरीही कोच शर्मा यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. “आम्ही चांगली कामगिरी करु शकलो असतो पण रौप्य पदकावर आम्ही समाधानी आहोत. पदक जिंकल्यावर मीराबाई माझ्याकडे आली आणि तिने मला लगेच सांगितलं की सर आपलं पदकाचं स्वप्न पूर्ण झालं.” स्नॅच आणि क्लिन अँड जर्क प्रकारात मीराबाईने २०२ किलो वजन उचलत आपलं पदक निश्चीत केलं.

या प्रकारात चीनच्या खेळाडूने सुवर्ण तर इंडोनेशियाच्या खेळाडूने रौप्य पदकाची कमाई केली. या कामगिरीनंतर मीराबाई चानू वेटलिफ्टींग प्रकारात भारतासाठी मेडल मिळवणारी दुसरी महिला ठरली आहे. याआधी २००० साली सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत कर्नम मल्लेश्वरीने वेटलिफ्टींग प्रकारात पदकाची कमाई केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *