Home » Uncategorized » बुलढाण्यात व्यापाऱ्याची तलवारीचे वार करून हत्या करणाऱ्या तिघांना पोलिसांनी केली अटक

बुलढाण्यात व्यापाऱ्याची तलवारीचे वार करून हत्या करणाऱ्या तिघांना पोलिसांनी केली अटक

बुलढाण्यात-व्यापाऱ्याची-तलवारीचे-वार-करून-हत्या-करणाऱ्या-तिघांना-पोलिसांनी-केली-अटक

जका खान, प्रतिनिधी बुलढाणा

महाराष्ट्रातल्या बुलढाणा शहरात व्यापाऱ्याची हत्या करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांनी 16 नोव्हेंबरला रात्री दहा वाजता बुलढाण्यात रात्री एका दुकानावर 10 वाजता सशस्त्र दरोडा टाकला. या दरोड्यात दुकान मालकांची त्यांनी हत्या केली आणि हे तिघेही घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. बुलढाणा पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि मोटरसायकलचा नंबर मिळाला त्याआधारे तिघांना अटक केली आहे.

अटक कऱण्यात आलेल्या तिघांना आता कोर्टात हजर केलं जाणार आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाण्यातल्या चिखलीमध्ये आनंद इलेक्ट्रॉनिक्स नावाचं दुकान आहे आहे. या दुकानाचे मालक कमलेश पोपट यांनी आपल्या दुकानाचं शटर रात्री दहा वाजता बंद केलं. त्यावेळी कमलेश यांच्या हातात असलेले पैसे ते पिशवीत ठेवत होते. त्याचवेळी दोनजण त्या ठिकाणी आले. एकाच्या हातात तलवार आणि दुसऱ्याच्या हातात पिस्तुल होती. काही कळायच्या आत या दुकानदारावर हल्ला केला आणि त्याच्या हातातली पैशांची थैली घेऊन पळ काढला. हे सगळं प्रकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *