Home » महाराष्ट्र » एकतर्फी प्रेमातून मित्राची हत्या

एकतर्फी प्रेमातून मित्राची हत्या

एकतर्फी-प्रेमातून-मित्राची-हत्या

मित्राच्या पत्नीशी असणाऱ्या एकतर्फी प्रेमातून मित्राची हत्या करणाऱ्या आरोपीस सहा दिवसानंतर अटक करण्यात आली आहे.

आरोपीस कोठडी, एकाचा शोध सुरू

नवी मुंबई  : मित्राच्या पत्नीशी असणाऱ्या एकतर्फी प्रेमातून मित्राची हत्या करणाऱ्या आरोपीस सहा दिवसानंतर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अजून एका आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आरोपीस २८ तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

राजू हरिनारायन महाराणा असे आरोपीचे नाव असून तो स्वत:चे नाव अर्जुन हरिनारायण चौधरी असे सांगत होता. त्याला अटक केल्यावर त्याचे खरे नाव समोर आले. राजू आणि मयत नागेंद्र पांडे हे मित्र होते. दोघेही घणसोली गावात राहत होते. राजू याचे नागेंद्र पांडे याच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम होते.

याची कुणकुण नागेंद्र याला लागली होती. रविवारी नागेंद्र हा राजूच्या घरी जातो सांगून निघून गेला तो पुन्हा आलाच नाही. या बाबत नागेंद्र बेपत्ता झाल्याची तक्रार रबाळे पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती.

दरम्यान, हा तपास सुरू असताना राजू याच्या घराबाहेर नागेंद्र याची चप्पल व छत्री असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी राजूच्या घराचा दरवाजा तोडला असता नागेंद्रचा मृतदेह तेथे सापडला. त्याच्या डोक्यावर जड वस्तूने व चाकूचे अनेक वार केल्याचे समोर आले होते.

या प्रकरणी उत्तरप्रदेश व पश्चिम बंगाल राज्यात तपास पथके पाठवली आली होती. मात्र, आरोपी बंगालमधून पुन्हा मुंबईकडे येत असल्याची माहिती समोर आल्यावर तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला इगतपुरी येथून अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी महाराष्ट्र माझा दिली.

महाराष्ट्र माझा आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Maharashtra Maza News) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2021 12:49 am

Web Title: murder of a friend out of one sided love ssh 93

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *