Home » Uncategorized » ‘माझी प्रार्थना आहे की, आज आर्यन खानला जामीन मिळावा’, BJP आमदार राम कदम नेमकं काय म्हणाले?

‘माझी प्रार्थना आहे की, आज आर्यन खानला जामीन मिळावा’, BJP आमदार राम कदम नेमकं काय म्हणाले?

‘माझी-प्रार्थना-आहे-की,-आज-आर्यन-खानला-जामीन-मिळावा’,-bjp-आमदार-राम-कदम-नेमकं-काय-म्हणाले?
साहिल जोशी

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण लागलं होतं. एकीकडे याप्रकरणी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते हे या प्रकरणी NCB सह भाजपवर टीका करत होते. तर भाजपकडून देखील याप्रकरणातील आरोपींवर निशाणा साधला जात होता. अशावेळी आता मात्र, अचानक भाजप नेत्याने थेट आर्यन खानची बाजू घेत त्याला जामीन मिळावा अशी मागणी केली आहे.

क्रूझ ड्रग्स प्रकरणात राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल करणारे भाजपचे आमदार राम कदम यांनी आता मात्र आर्यन खानला जामीन मिळालाच पाहिजे असं मत मांडलं आहे.

पाहा राम कदम नेमकं काय म्हणाले:

‘प्रार्थना आहे की आज आर्यन खानला जामीन मिळावा. संविधान अन् कायद्याप्रमाणे जामीन मिळणे हा एक मूलभूत अधिकार आहे. ही लढाई कोणा एक व्यक्ती विशेषच्या विरोधातील लढाई नाही. अखंड मानव जातीच्या ड्रग्सविरोधी ही लढाई आहे.’

‘आता बदललेल्या भारतात कोणी श्रीमंत, गरीब, नेता किंवा अभिनेता हे सर्व कायद्याच्यासमोर समान आहेत. भविष्यात आर्यन ज्या ड्रग्स प्रकरणामुळे बदनाम झाला. त्याच ड्रग्सच्या विरोधात त्याने प्रखर लढाई उभी करून युवकांना ड्रग्सपासून दूर करण्यासाठी काम करुन संकटाचे संधीत रूपांतर करावे यासाठी एक देशवासिय या नात्याने शुभेच्छा.’ अशा शब्दात राम कदम यांनी आर्यन खानसाठी बॅटिंग केली आहे.

दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांनी अचानक बदलेल्या या भूमिकेमुळे आता सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दुसरीकडे आर्यन खान याला आज जामीन मिळणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. कारण 14 ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने आर्यनसह इतर आरोपींचा जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. यावेळी कोर्टाने असं म्हटलं होतं की, शक्य झाल्यास आम्ही 20 तारखेला निर्णय जाहीर करु. परंतु सध्या तरी आम्ही कामकाजात फार व्यस्त आहोत. मात्र, तरीही या प्रकरणी आम्ही 20 तारखेलाच निर्णय देण्याचा संपूर्ण प्रयत्न करु.

यामुळे आता आर्यन खानला आज तरी जामीन मिळणार की नाही याकडेच त्याच्या कुटुंबीयांचे डोळे लागून राहिले आहेत. दरम्यान, यावेळी कोर्ट नेमकं काय निर्णय देतं त्यावर NCB काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed