Home » Uncategorized » मोठी दुर्घटना टळली! लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ ‘इंदोर-दौंड एक्सप्रेस’ घसरली

मोठी दुर्घटना टळली! लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ ‘इंदोर-दौंड एक्सप्रेस’ घसरली

मोठी-दुर्घटना-टळली!-लोणावळा-रेल्वे-स्थानकाजवळ-‘इंदोर-दौंड-एक्सप्रेस’-घसरली

रुळावरून घसरलेल्या बोगी.

लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी मोठी दुर्घटना सुदैवाने होता होता टळली. दोन डबे लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ घसरून इंदोर-दौंड एक्सप्रेसला अपघात झाला. या घटनेमुळे मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळित झाली आहे. (Indore-Daund special derailed at Lonavala)

सोमवारी इंदोर-दौंड एक्स्प्रेसला अपघात झाला. पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे प्रशासनाकडून घसरलेले डबे पुन्हा रूळावर आणण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

दरम्यान, सुदैवाने या घटनेत काहीही दुर्घटना घडलेली नाही. लोणावळा रेल्वे स्थानकात येताना हा ही घटना घडली. त्यामुळे तत्काळ यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, डब्बे रुळावर घेण्याचे काम सुरु झाले आहे. लवकरच रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत होईल, असं संबंधित प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *