Home » महाराष्ट्र » Poker, MMA टेलिशॉपिंग, राज कुंद्राच्या व्यवसाय साम्राज्याचे वादग्रस्त भाग

Poker, MMA टेलिशॉपिंग, राज कुंद्राच्या व्यवसाय साम्राज्याचे वादग्रस्त भाग

poker,-mma-टेलिशॉपिंग,-राज-कुंद्राच्या-व्यवसाय-साम्राज्याचे-वादग्रस्त-भाग

HotShot या App वर अश्लील व्हीडिओज आणि सेक्स कंटेट इतका वाढला होता की ते App आधी Appale Play Store आणि नंतर अँड्रॉईडने रिमूव्ह केलं. HD videos and Short movies असं या अॅपचं डिस्क्रिप्शन देण्यात आलं होतं. या अॅपवर जगभरातल्या मॉडेल्ससोबत लाईव्ह कम्युनिकेशनही करता येत होतं. या ठिकाणी तयार होणाऱ्या शॉर्ट फिल्म आणि वेब सीरिजमध्ये काम देतो असं आमिष पुरूष आणि स्त्री कलाकारांना दिलं जात होतं आणि त्यांच्याकडून न्यूड किंवा सेमी न्यूड सीन शूट करून घेतले जात होते. हेच सीन या App मध्ये प्रसारितही केले जात होते. मुंबई पोलिसांनी या संदर्भातली माहिती दिली.

राज कुंद्रा यांना स्पोर्ट्स आणि टेक्निकल गोष्टी यामध्ये कायमच रस होता. त्याने कुठे कुठे गुंतवणूक केली या गोष्टी लक्षात घेतल्या तर पहिली होती ती आयपीएल मात्र त्या टीमवर आणि राज कुंद्रावर जे आरोप झाले त्यानंतर राज कुंद्रावर बंदी घालण्यात आली.

त्यानंतर राज कुंद्राने MMA फायटिंग लीगमध्येही पैसे गुंतवले होते. तसंच पोकर या गेमिंग लीगमध्येही गुंतवणूक केली होती. एवढंच नाही तर राज कुंद्राने टेलिशॉपिंग चॅनल बेस्ट डिल टीव्हीमध्येही गुंतवणूक केली होती. मात्र राज कुंद्रा प्रकाशझोतात येण्याचं कारण होतं त्याने त्याची बायको शिल्पा शेट्टीसोबत आयपीएलमध्ये गुंतवणूक केली होती. 2009 मध्ये राज कुंद्राने राजस्थान रॉयल्स या संघात 12 टक्के गुंतवणूक केली होती. राजस्थान रॉयल हा संघ 2008 मधला विजेता संघ होता. त्यामुळे राज कुंद्राला लगेचच प्रसिद्धी मिळाली. 2013 पर्यंत सगळं सुरूळीत सुरू होतं. मात्र 2013 मध्येच राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज हे दोन संघ स्पॉट फिक्सिंग करत असल्याची बाब समोर आली.

2015 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या पॅनलने दोन्ही टीम्सवर दोन वर्षांची बंदी घातली. त्यामुळे या दोन्ही टीम 2016 आणि 2017 मध्ये आयपीएल खेळू शकल्या नाहीत. स्पॉट फिक्सिंगचा वाद आणखी रंगला जेव्हा यामध्ये राज कुंद्रा आणि गुरूनाथ मयप्पन सामील असल्याची बाब समोर आली. त्यानंतर आयपीएलशी संबंधित सगळ्या गोष्टींबाबत राज कुंद्रावर बंदी घातली गेली.

2012 मध्ये राज कुंद्राने संजय दत्त सोबत मिळून MMA म्हणजेच mixed martial arts च्या लीगमध्येही पैसे गुंतवले होते. यावेळी अभिनेता संजय दत्त हा त्याचा पार्टनर होता. या लीगसाठी त्यांनी मेरी कोमलाही ब्रांड अँब्रसेडर म्हणून निवडलं होतं. ही लीग त्यावेळी ESPN स्टार स्पोर्ट्स, Colors, Nep Prime या चॅनल्सवर दाखवण्यात आली. तसंच यू ट्युबवरही ही लीग प्रसारित करण्यात आली.

त्यानंतर अशाच प्रकारे मॅच इंडियन पोकर लीग. ही लीगही राज कुंद्राच्या विहान इंडस्ट्रीजसोबत संलग्न होती. विहान इंडस्ट्रीजचा सहभाग गेमिंग, अॅनिमेशन या सगळ्यामध्ये होता.यानंतर राज कुंद्राने बेस्ट डिल टीव्हीमध्येही गुंतवणूक केली. हे 24-7 ऑनलाईन शॉपिंग चॅनल होतं. अभिनेता अक्षय कुमारचाही यामध्ये छोटासा सहभाग होता. हे चॅनल 2015 मध्ये सुरू झालं. ज्यानंतर ते सगळ्या प्रमुखे केबल नेटवर्क डीटीएच चॅनल्सवरही हे चॅनल दिसू लागलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *