Home » महाराष्ट्र » फ्रान्सवरून आणखी तीन राफेल विमानं भारतात दाखल!

फ्रान्सवरून आणखी तीन राफेल विमानं भारतात दाखल!

फ्रान्सवरून-आणखी-तीन-राफेल-विमानं-भारतात-दाखल!

भारतीय वायू सेनेकडून ट्विटद्वारे देण्यात आली माहिती

हवाई मार्गात मदत पुरवल्या बद्दल यूएई वायू सेनेचे आभार व्यक्त केले आहेत. (संग्रहीत छायाचित्र)

राफेल लढाऊ विमानांच्या सातव्या खेपेत आज आणखी तीन विमानं फ्रान्सवरून थेट भारतात दाखल झाली आहेत. जवळपास ८ हजार किलोमीटरचा प्रवास करून ही विमानं भारतात आली आहेत. या विमानांचा भारतीय वायूसेनेच्या राफेल विमानांच्या दुसऱ्या स्क्वाड्रनमध्ये समावेश केला जाणार आहे.

भारतीय वायू सेनेने ही तीन विमानं भारतात दाखल झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. या विमानांच्या प्रवासा दरम्यान हवाई मार्गात यूएईने त्यांना इंधन उपलब्ध करून दिलं. याबद्दल भारतीय वायू सेनेकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

Three Rafale aircraft arrived in India a short while ago, after a direct ferry from #IstresAirBase, France.

IAF deeply appreciates the support by UAE Air Force for in-flight refuelling during the non-stop ferry.

— Indian Air Force (@IAF_MCC) July 21, 2021

फ्रान्सच्या इस्त्रेस एअर बेसवरून उड्डाण घेऊन न थांबता तीन राफेल विमानं काही वेळापूर्वीच भारतात पोहचली. हवाई मार्गात मदत पुरवल्या बद्दल यूएई वायू सेनेला भारतीय वायू सेना धन्यवाद देते. असं ट्विट वायू सेनेकडून ट्विट करण्यात आलं आहे.

राफेल विमानांची ही खेप भारतात पोहचल्यानंतर आता भारताकडे २४ राफेल विमानं झाली आहेत. राफेल जेटची नवीन स्क्वाड्रन पश्चिम बंगालच्या हासीमारा एअर बेसवर असेल. पहिली राफेल स्क्वाड्रन अंबाला वायू सेना स्टेशनवर आहे. एका स्क्वाड्रनमध्ये १८ विमानं असतात.

महाराष्ट्र माझा आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Maharashtra Maza News) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 9:30 pm

Web Title: three rafale aircraft arrived in india a short while ago msr 87

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *