Home » महाराष्ट्र » BJP ची वृत्ती मनोरूग्ण असल्यानेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं-नाना पटोले

BJP ची वृत्ती मनोरूग्ण असल्यानेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं-नाना पटोले

bjp-ची-वृत्ती-मनोरूग्ण-असल्यानेच-राजीव-गांधी-खेलरत्न-पुरस्काराचं-नाव-बदललं-नाना-पटोले

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

भाजपची वृत्ती मनोरूग्ण असल्याने आणि भाजपला गांधी परिवाराची भीती वाटत असल्यामुळेच भाजपने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार यांचं नाव दिलं आहे अशी टीका आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मोदी सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव पुसून स्वतःचं नाव स्टेडियमला देणारे पंतप्रधान आहेत. नावांच्या भानगडीत पडण्यापेक्षा त्यांनी महागाई बेरोजगारीवर लक्ष द्यायला हवं आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे हॉकीतील योगदान मोठे आहे. त्यांच्या सन्मानार्थ दुसरा पुरस्कार देता आला असता किंवा त्यांच्या नावाने क्रीडा क्षेत्रासाठी मोठी योजना राबवता आली असती, त्यातून मेजर ध्यानचंद यांचा सन्मानच झाला असता. त्यांच्या नावाला विरोध असण्याचे कारण नाही त्यांचे नाव दिल्याचा आम्हाला आनंदच आहे परंतु केवळ गांधी द्वेषातून नाव बदलणे हे हीन पातळीच्या राजकारणाचे दर्शन घडवते. स्व. राजीव गांधी यांनी आधुनिक भारतासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या नावाने विविध क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा या पुरस्काराच्या माध्यमातून यथोचित सन्मान केला जात असे. राजीव गांधी यांचे देशाच्या विकासातील योगदान व करोडो लोकांच्या मनातील स्थान मोठे असून अशा पद्धतीने ते स्थान तसूभरही कमी होणार नाही असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

राजीव गांधी यांच्या नावालाच विरोध असेल तर मग नरेंद्र मोदी यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान तरी काय? अहमदाबादमधील मोटेरा क्रिकेट स्टेडीयमलासुद्धा एखाद्या महान क्रीकेटपटूचे नाव देता आले असते परंतु  त्याचे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम हे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडीयम केलेच, त्यामुळे  राजीव गांधी यांचे नाव बदलल्याने आश्चर्य वाटत नाही, ही कृत्ती भाजपा व संघाच्या द्वेष वृत्तीतून आलेली आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

28 डिसेंबरला राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची शिवाजी पार्कवर सभा

28 डिसेंबर या तारखेला काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. त्या निमित्ताने सोनीया गांधी आणि राहुल गांधी यांची सभा व्हावी, ही राज्यभरातील नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळे ही सभा मुंबईत होत आहे.

राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीबाबत विचारलं असता नाना पटोले म्हणाले सध्या भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे आता ते दुसऱ्यांचा आधार घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.