Home » महाराष्ट्र » Ashadhi Ekadashi : Corona मुळे यंदाचीही वारी हुकली? घरबसल्या घ्या विठुरायाचं दर्शन

Ashadhi Ekadashi : Corona मुळे यंदाचीही वारी हुकली? घरबसल्या घ्या विठुरायाचं दर्शन

ashadhi-ekadashi-:-corona-मुळे-यंदाचीही-वारी-हुकली?-घरबसल्या-घ्या-विठुरायाचं-दर्शन
Ashadhi Ekadashi : Corona मुळे यंदाचीही वारी हुकली? घरबसल्या घ्या विठुरायाचं दर्शन

फोटो सौजन्य – विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समिती

Published on

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचीही आषाढी एकादशी निर्बंधात पार पडते आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज शासकीय महापुजा संपन्न झाली. एरवी पंढरपूर शहर हे आजच्या दिवशी लाखो वारकऱ्यांनी फुलून जातं, परंतू यंदा विठुरायालाही आपल्या लाडक्या भक्तांचं दर्शन झालेलं नाही. मात्र आजच्या दिवशी पंढरपूरातलं मंदीर अशा पद्धतीने आकर्षक फुलांनी सजवण्यात आलंय.

विविध प्रकारच्या गुलाबांनी देवाचा गाभारा सजवण्यात आला आहे. या फुलांमध्ये देवाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

यंदाही कोरोना महामारीमुळे देवाचा गाभारा भक्तांविना असा सुनासुनाच होता.

गुलाब, जाई-जुई, मोगरा, शेवंती अशी अनेक फुलं आणि फळांची सजावट आजच्या दिवशी मंदिरात करण्यात आली आहे.

आकर्षक झेंडूच्या फुलांनी केलेल्या सजावटीमुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदीराचं पालटलेलं रुप…

मंदीराच्या गाभाऱ्यासोबत खांबही अशाच पद्धतीने सजवण्यात आले आहेत.

तिरंगी फुलांच्या सजावटीत विठुरायाचं हे लोभसवाणं रुप अत्यंत मनमोहक दिसत आहे.

आजच्या दिवशी पंढरपूर शहर सुमारे १० लाख वारकऱ्यांनी फुलून जातं. परंतू कोरोना महामारीमुळे विठुरायालाही आपल्या लाडक्या भक्तांची वाट पाहत उभं रहावं लागणार असं दिसतंय.

पायी वारी सोहळ्याला परवानगी मिळावी यासाठी यंदा अनेक वारकरी नेत्यांनी प्रयत्न केले. यासाठी सुप्रीम कोर्टाचे दरवाजेही ठोठावण्यात आले. परंतू वारकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली.

शासकीय पुजेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यावरचं कोरोनाचं संकट टळू दे आणि पुन्हा एकदा पंढरपूर वारकऱ्यांनी तुडुंब भरलेलं पहायला मिळू दे अशी प्रार्थना विठ्ठलाचरणी केली.

पायी वारी सोहळ्याला यंदा परवानगी नाकारण्यात आल्यामुळे अनेक वारकऱ्यांचा हिरमोड झाला होता. परंतू मुंबई तक च्या माध्यमातून तुम्ही आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published.