Home » महाराष्ट्र » Video: चिमुरड्या विद्यार्थ्याने शिक्षिकेला असा भरला दम, थेट धमकी देत म्हणाला “माझे बाबा पोलीस आहेत तुम्हाला”…

Video: चिमुरड्या विद्यार्थ्याने शिक्षिकेला असा भरला दम, थेट धमकी देत म्हणाला “माझे बाबा पोलीस आहेत तुम्हाला”…

video:-चिमुरड्या-विद्यार्थ्याने-शिक्षिकेला-असा-भरला-दम,-थेट-धमकी-देत-म्हणाला-“माझे-बाबा-पोलीस-आहेत-तुम्हाला”…

Viral Video: तू जानता नहीं मेरा बाप कौन है! एखाद्या शाळकरी मुलाकडून कधी हे ऐकावं लागेल असं कधी वाटलं होतं का?

Viral Video: तू जानता नहीं मेरा बाप कौन है! हे वाक्य साधारण अनेक चित्रपटात विशेषतः वेबसीरीज मध्ये आपण ऐकून असाल. पण एखाद्या शाळकरी मुलाकडून कधी हे ऐकावं लागेल असं कधी वाटलं होतं का? या शाळेतील शिक्षिकेने तर कधी हा विचारही केला नसेल. एका बालवाडीतल्या चिमुकल्याने चक्क आपल्या शिक्षिकेला धमकी देऊन माझे बाबा पोलीस आहेत तुम्ही मला मारलंत तर ते तुम्हाला बंदुकीने गोळ्या मारतील असं ठणकावून सांगितलं आहे. ऐकूनच धक्का बसला ना? आता हा व्हिडीओ जेव्हा पाहाल तेव्हा तुम्ही आणखीनच चक्रावून जाल.

अलीकडेच हा २७ सेकंदांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. ज्यात एक लहानगा विद्यार्थी आपल्या शिक्षिकेवर नाराज दिसत आहे. कदाचित या शिक्षिकेने ओरडल्यावर मग त्याने चिडून धमकावले आहे. यात विद्यार्थी म्हणतो की माझे बाबा पोलीस आहेत ज्यावर शिक्षिका विचारते मग आम्ही काय करू? तर हा चिमुरडा चक्क ते तुम्हाला गोळ्या मारतील असं सांगतो. यावर शिक्षिका विचारते तुला इथे शिकायला आवडत नाही का तर यावर हा चिमुकला असं काही बोलतो की ते बघून तुम्ही हैराणही व्हाल पण चेहऱ्यावर एक स्माईलसुद्धा येईल. बघा..

Video: सज्जनगडावर हरवलेले माय- लेक भेटले; बछड्याला घ्यायला आली बिबट्याची आई, पाहा सुंदर क्षण

@Gulzar_sahab या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ४४ हजार व्ह्यूज मिळाले आहेत, तसेच २ हजाराहून अधिक लाईक्स आहेत. अनेक ट्विटर युजर्सनी यावर कमेंट करून हे अत्यंत चुकीचे संस्कार असल्याचं म्हटलंय तर काहींनी तो लहान आहे असं म्हणत पालकांना दोष दिला आहे. अशातच काहींनी त्याच्या धाडसाची दाद दिली आहे तर आम्ही असं बोललो असतो तर आमच्या शिक्षिकेने शाळेतून काढून टाकलं असतं असेही म्हंटले आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

Raju Srivastava Death: राजू श्रीवास्तव यांच्यावर टीका करताना AIB फेम रोहन जोशीची जीभ घसरली; म्हणाला “बरं झालं तू गेला”…

दरम्यान हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप समजलेलं नाही मात्र भाषा ऐकता साधारण उत्तर भारतातील व्हिडीओ असावा असे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी प्रयागराजमधील एक विद्यार्थी व शिक्षिकेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात मस्तीखोर विद्यार्थ्याला शिक्षिका ओरडते पण तो मुलगा इतक्या गोड अंदाजात शिक्षिकेची माफी मागतो की अनेकजण त्यावर फिदा झाले होते.

Web Title: Viral video mere papa police hai nursery student threatens teacher as she scolds him svs

Leave a Reply

Your email address will not be published.