Home » महाराष्ट्र » सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी शेवटच्या आरोपीला अटक; चौकशीनंतर केला नवा खुलासा, सलमान खानचं नाव घेत म्हणाला…

सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी शेवटच्या आरोपीला अटक; चौकशीनंतर केला नवा खुलासा, सलमान खानचं नाव घेत म्हणाला…

सिद्धू-मूसेवाला-हत्येप्रकरणी-शेवटच्या-आरोपीला-अटक;-चौकशीनंतर-केला-नवा-खुलासा,-सलमान-खानचं-नाव-घेत-म्हणाला…

सिद्धू मूसेवाला हत्याप्रकरणातील अखेरच्या आरोपीला शनिवारी पोलिसांनी अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सिद्धू मूसेवाला हत्याप्रकरणातील अखेरच्या आरोपीला शनिवारी पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित आरोपीसोबत अन्य दोघांनाही पोलिसांनी जेरबंद केलं आहे. या आरोपींची प्राथमिक चौकशी केली असता, बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या हत्येच्या योजनेबाबतची माहिती समोर आली आहे. सिद्धू मूसेवालाप्रमाणे सलमान खानवरही हल्ला करण्याची योजना असल्याचे संकेत पोलिसांना मिळाले आहेत.

नेपाळ पोलिसांनी शनिवारी सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील शेवटचा आरोपी दीपक मुंडी याला अटक केली. दीपक मुंडीसोबत त्याचे दोन साथीदार कपिल पंडित आणि राजिंदर यांनाही पोलिसांनी पश्चिम बंगाल-नेपाळ सीमेवरून अटक केली. संबंधित आरोपींची चौकशी केली असता सलमान खानवरही हल्ला करण्याची योजना असल्याचे संकेत पोलिसांना मिळाले आहेत. सर्व आरोपींना मानसा न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, सलमान खानवर हल्ला करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईने रेकी केली होती, ही रेकी करण्यात आरोपी कपिल पंडितचा समावेश होता. सलमान खानवर हल्ला करण्याच्या योजनेत इतरही आरोपींचा समावेश आहे का? याची अधिकची चौकशी करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी दिली.

हेही वाचा- सलमान खानने घेतली पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट ; सुरक्षेच्या कारणास्तव बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज सादर

यावर्षी जूनमध्ये बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. “तुझाही सिद्धू मूसेवाला करून टाकू” अशा आशयाचं निनावी पत्र सलमान खानच्या घराजवळ आढळलं होतं. या प्रकारानंतर पोलिसांनी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली. १९९८ साली काळवीट शिकार केल्याप्रकरणी धडा शिकवण्यावासाठी २०१८ मध्ये सलमान खानला मारण्याची योजना आखली होती. त्यासाठी काही साथीदारांना सलमान खानच्या घराची रेकी करण्यासाठी आणि त्याची हत्या करण्यासाठी मुंबईला पाठवलं होतं, असा खुलासा लॉरेन्स बिश्नोईने केला होता.

1 thought on “सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी शेवटच्या आरोपीला अटक; चौकशीनंतर केला नवा खुलासा, सलमान खानचं नाव घेत म्हणाला…

Leave a Reply

Your email address will not be published.