Home » महाराष्ट्र » मोटारीच्या धडकेने पादचारी तरुणाचा मृत्यू; विश्रांतवाडी भागात अपघात

मोटारीच्या धडकेने पादचारी तरुणाचा मृत्यू; विश्रांतवाडी भागात अपघात

मोटारीच्या-धडकेने-पादचारी-तरुणाचा-मृत्यू;-विश्रांतवाडी-भागात-अपघात

मोटारीच्या धडकेने पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना विश्रांतवाडी परिसरात घडली.

पुणे : मोटारीच्या धडकेने पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना विश्रांतवाडी परिसरात घडली. पसार झालेल्या मोटारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

अमित मोहन शिंदे (वय ३०, रा. धानोरी रस्ता, विश्रांतवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. अमितचा मामेभाऊ राहुल कांबळे (वय ३६, रा. विश्रांतवाडी) याने या संदर्भात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमित रात्री साडेअकराच्या सुमारास आळंदी रस्त्याने जात होता. चव्हाण चाळीसमोर भरधाव मोटारीने रस्ता ओलांडणाऱ्या अमितला धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता मोटारचालक पसार झाला.

गंभीर जखमी झालेल्या अमितला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पसार झालेल्या मोटारचालकाचा पोलिसांकडून शोध‌ घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम तपास करत आहेत.

Web Title: Pedestrian dies being hit car accidents filed case against pune print news ysh

Leave a Reply

Your email address will not be published.