Home » महाराष्ट्र » आधी गेटवरही उभं केलं नाही अन् नंतर…; शाहरुख खानच्या प्रोडक्शन कंपनीने संतोष जुवेकरला केला फोन, नेमकं काय घडलं?

आधी गेटवरही उभं केलं नाही अन् नंतर…; शाहरुख खानच्या प्रोडक्शन कंपनीने संतोष जुवेकरला केला फोन, नेमकं काय घडलं?

आधी-गेटवरही-उभं-केलं-नाही-अन्-नंतर…;-शाहरुख-खानच्या-प्रोडक्शन-कंपनीने-संतोष-जुवेकरला-केला-फोन,-नेमकं-काय-घडलं?

अभिनेता संतोष जुवेकर आलिया भट्टच्या ‘डार्लिंग्स’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

मराठी चित्रपट, मालिकांमध्ये अभिनेता संतोष जुवेकरेने उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तो इथवरच थांबला नाही तर त्याने वेबसीरिज, हिंदी चित्रपटांमध्येही काम करण्याचा निर्णय घेतला. संतोष त्याच्या भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. आता तो आलिया भट्टचा बहुचर्चित ‘डार्लिंग्स’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. याचनिमित्त संतोषने एक पोस्ट शेअर करत आपला अनुभव सांगितला.

आणखी वाचा – “दोन मंत्र्यांच्या बायकांचं एकमेकींशी जमतं का?” प्रश्नावर अमृता फडणवीसांचं भन्नाट उत्तर

आपल्या करिअरच्या सुरुवातीचे दिवस ते ‘डार्लिंग्स’ पर्यंतचा प्रवास संतोषने आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितला आहे. त्याने सांगितलं की, “वर्ष -१९९८. ठिकाण – दीप भवन, Dreams unlimited production (शाहरुख खान आणि जुही चावला प्रॉडक्शन ऑफिस) मी ऑफिसच्या बाहेर उभा राहून आत जाता येईल का? कुणाला भेटता येईल का? म्हणून गेटवर जाऊन एका सुरक्षारक्षकाला विचारतो. तर तो मला ओरडून “चल इथून निघ. कोणी बोलावलं तरच इथे यायचं. आता इथून जा” असं म्हणतो. आणि मी त्यावेळी थोडासा नाराज होऊन, थोडासा चिडून त्याला बोलतो “तू थांबच…एक दिवशी तूच माझ्यासाठी हा गेट उघडशील.”

ज्या कंपनीच्या गेटवरूनच निघून जाण्यासाठी संतोषला सांगण्यात आलं आज त्याच कंपनीच्या चित्रपटामध्ये तो अभिनेता म्हणून काम करत आहे. हे संतोषसाठी एक स्वप्नच होतं. शाहरुख खानच्या रेड चिलीज एन्टरटेन्मेंट कंपनीमधून ‘डार्लिंग्स’साठी जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा संतोषची प्रतिक्रिया काय होती? त्याचा हा संपूर्ण प्रवास कसा होता हे त्याने सांगितलं आहे.

आणखी वाचा – Video : “माझा मुलगा चार पावलं…” लेकाची करामत अन् बायकोचा राग, कुशल बद्रिकेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

‘डार्लिंग्स’मध्ये संतोष एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसत आहे. तसेच जसमीत के रीनने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आलियासह शाहरुख खानच्या रेड चिलीज कंपनीने या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. आलियाचा हा चित्रपट येत्या ५ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

Web Title: Actor santosh juvekar share emtional post and he play role in aalia bhatt darlings movie see details kmd

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed