Home » महाराष्ट्र » …अन् प्रियांका म्हणाली, ‘निकमध्ये मला माझे वडील दिसतात’

…अन् प्रियांका म्हणाली, ‘निकमध्ये मला माझे वडील दिसतात’

…अन्-प्रियांका-म्हणाली,-‘निकमध्ये-मला-माझे-वडील-दिसतात’

२०१३मध्ये प्रियांकाचे वडील अशोक चोप्रा यांचे कॅन्सरने निधन झाले.

२०१८मध्ये प्रियांकाने हॉलिवूड गायक निक जोनासशी भारतात लग्न केले.

हॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. आज १८ जुलै रोजी प्रियांकाचा ३९वा वाढदिवस आहे. तिने २०१८मध्ये हॉलिवूड गायक निक जोनासशी भारतात लग्न केले. निक आणि प्रियांका सतत एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. एका मुलाखतीमध्ये प्रियांकाने वडील आणि पती यांच्या अनेक सवयी साधारण सारख्या असल्याचे सांगितले.

२०१३मध्ये प्रियांकाचे वडील अशोक चोप्रा यांचे कॅन्सरने निधन झाले. प्रियांका आणि तिच्या वडिलांचे खूप चांगले बाँडिंग होते. ती तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी वडिलांसोबत शेअर करायची. २०१९मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्राने पती निक जोनासमध्ये वडील दिसत असल्याचे म्हटले होते.

आणखी वाचा : ‘शूटिंगचा पहिला दिवस होता आणि…’, ‘मोमो’ने सांगितला अनुभव

मुंबई मिररशी संवाद साधताना प्रियांका म्हणाली, ‘मला असे वाटते की मी अशा व्यक्तीशी लग्न केले आहे ज्याच्यामध्ये मला माझे वडील दिसतात. केवळ संगीतच नाही तर अनेक गोष्टींत दोघांमध्ये साम्य आहे. निक कोणताही निर्णय घेताना पाहिले माझा विचार करतो.’

पुढे प्रियांका म्हणाली, ‘जेव्हा रोज सकाळी तुम्ही उठता आणि उठल्यानंतर तुम्हाला माहिती असते की ही व्यक्ती स्वत: पेक्षा तुमचा जास्त विचार करते या पेक्षा आनंददायी आणखी काय असू शकतं.’ निकदेखील अनेक मुलाखतींमध्ये प्रियांका विषयी बोलताना दिसतो.

महाराष्ट्र माझा आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Maharashtra Maza News) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2021 11:44 am

Web Title: when priyanka chopra said husband nick jonas is a chhavi of her late father avb 95

Leave a Reply

Your email address will not be published.