Home » महाराष्ट्र » विम्बल्डन टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचा विजयारंभ; रुड, कोंटाव्हेटची आगेकूच; हुरकाझला पराभवाचा धक्का

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचा विजयारंभ; रुड, कोंटाव्हेटची आगेकूच; हुरकाझला पराभवाचा धक्का

विम्बल्डन-टेनिस-स्पर्धा-:-जोकोव्हिचचा-विजयारंभ;-रुड,-कोंटाव्हेटची-आगेकूच;-हुरकाझला-पराभवाचा-धक्का

गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचने सोमवारी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचा विजयारंभ केला.

वृत्तसंस्था, लंडन : गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचने सोमवारी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचा विजयारंभ केला. तसेच पुरुषांमध्ये नॉर्वेचा कॅस्पर रुड आणि महिलांमध्ये अ‍ॅनेट कोंटाव्हेट या मानांकित खेळाडूंनी दुसरी फेरी गाठली. सातव्या मानांकित पोलंडच्या हबर्ट हुरकाझला मात्र पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला.

अग्रमानांकित जोकोव्हिचने दोन तास २७ मिनिटे चाललेल्या पहिल्या फेरीच्या लढतीत कोरियाच्या क्वान सून-वूला ६-३, ३-६, ६-३, ६-४ असे नमवले. तिसऱ्या मानांकित कॅस्पर रुडने स्पेनच्या अ‍ॅल्बर्ट रामोस-व्हिनोलासवर ७-६ (७-१), ७-६ (११-९), ६-२ अशी सरळ सेटमध्ये मात केली. परंतु, स्पेनच्या अलेहांद्रो डाव्हिडोव्हिच फोकिनाने पहिल्याच दिवशी धक्कादायक विजयाची नोंद करताना हुरकाझचा ६-७ (४-७), ४-६, ७-५, ६-२, ६-७ (८-१०) असा  पराभव केला. ब्रिटनच्या नवव्या मानांकित कॅमेरुन नॉरीने स्पेनच्या पाब्लो अँडूजारला ६-०, ७-६ (७-३), ६-३ असे सरळ सेटमध्ये पराभूत करत दुसऱ्या फेरीत धडक मारली.

महिला एकेरीत तिसऱ्या मानांकित टय़ुनिशियाच्या ओन्स जाबेऊरने स्वीडनच्या मिरयाम यॉर्कलंडला ६-१, ६-३ असे नामोहरम केले. तर, दुसऱ्या मानांकित इस्टोनियाच्या कोंटाव्हेटने अमेरिकेच्या बेर्नार्दा पेराला ७-५, ६-१ असे हरवले. तसेच दहाव्या मानांकित ब्रिटनच्या एमा रॅडूकानूने बेल्जियमच्या अ‍ॅलिसनचा ६-४, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करत आगेकूच केली.

Web Title: Wimbledon tennis tournament djokovic winning start rudd contavet defeat hurkaz ysh

Leave a Reply

Your email address will not be published.