Home » महाराष्ट्र » Pune DCP, साजूक तुपातल्या फुकट बिर्याणीचा फोन व्हायरल आणि गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Pune DCP, साजूक तुपातल्या फुकट बिर्याणीचा फोन व्हायरल आणि गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

pune-dcp,-साजूक-तुपातल्या-फुकट-बिर्याणीचा-फोन-व्हायरल-आणि-गृहमंत्र्यांनी-दिले-चौकशीचे-आदेश

काय आहे हा संवाद? कथित DCP महिला आणि कर्मचारी

विश्रामबागमध्ये नॉनव्हेज खूप चांगली मिळते असं ऐकलं आहे.

हो मॅडम SP ची साजूक तुपातली बिर्याणी चांगली मिळते

अजून..?

एक मटण थाळी म्हणून आहे..

चांगलं कुठे आहे?

साजुक तुपातली बिर्याणी

ते कसं मॅडम दोन- तीन प्रकार आहेत. ऑईल बिल्कुल नाही. कलर वगैरे नाही..

हम्म…

जी चांगली असेल ती जरा एक घेऊन आपल्या सोनावणेकडे पाठवून द्याल आणि जर काही काही याचा इश्यू असेल तर पीआयला सांगून द्याल..मी सांगितलं आहे म्हणून..

ठीक आहे मॅडम

मी बोलू का पीआयला?

नको मॅडम त्याच्या हद्दीमधे आहे..

बरं मला एक सांग त्याच्या हद्दीमधे आहे तर आपण पैसे कशाला द्यायचे तिथे? आपल्या हद्दीत असेल तरी पैसे द्यायचे का?

आपण याआधी विकतच घ्यायचो..ठीक आहे पीआयंशी बोलतो

काय? तुम्ही काय करायचे?

आपण कॅशच करायचो मॅडम

कॅश म्हणजे? पे करून? तेवढं करेल तो.. त्याच्यात काय एवढं?

मी सांगते, मला त्यादिवशी बोलला. आपल्या हद्दीत आहे तर त्याच्यासाठी पैसे खर्च करायचे का? I don’t Know बाबा

ठीक आहे मॅडम

दुसरं अजून कुठे प्रॉन्स वगैरे कुठे चांगलं मिळतं? जरा तोंडाला चव येईल.

आपल्या हद्दीतच विश्रामबागमध्येच.

हो मॅडम

पण ऑयली नको.. टेस्ट चांगली हवी आणि मसाला वगैरे फार नको.

हो मॅडम

जरा व्यवस्थित पद्धतीचं आहे

मटण की चिकन?

प्रॉन्स बिर्याणी सांगू का?

नाही रे प्रॉन्स वेगळे सांग आणि मटण बिर्याणी सांग

मला चिकन आवडतं आणि साहेबांना मटण आवडतं

प्रॉन्स सुखे हवेत त्याला ग्रेव्ही नको.. प्रॉन्स फ्राय वगैरे असतात ना तशा टाईपचं

जास्त ग्रेव्ही असेल तर प्रॉन्सची चव जाते..

हो मॅडम

सूप वगैरे सांगू का मॅडम?

नाही रे सुप नाही आवडत नाही..

सूप म्हणजे अळणी पाणी हो..

नाही ते नाही आवडत मला नंतर कधीतरी मागवू

रोटी चपाती काही मागवू का?

नाही नको ते मी घरी बनवते

मटण नल्ली निहारी सांगू का? टेस्ट करून बघा

एक काम कर मटणची भाजीमधे काही तरी सांग..

आणि बिर्याणी चिकनची सांग

हो चालेल मॅडम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed