Home » महाराष्ट्र » अग्निपथ योजनेविषयी रविना टंडनचं ट्विट, जयंत चौधरी म्हणाले, ‘आप मस्त रहो’

अग्निपथ योजनेविषयी रविना टंडनचं ट्विट, जयंत चौधरी म्हणाले, ‘आप मस्त रहो’

अग्निपथ-योजनेविषयी-रविना-टंडनचं-ट्विट,-जयंत-चौधरी-म्हणाले,-‘आप-मस्त-रहो’

मोदी सरकारने लष्कर भरती संदर्भात अग्निपथ योजना आणली. या योजनेच्या पहिल्या दिवसापासूनच या योजनेविरोधात विद्यार्थ्यांचा हुंकार पाहण्यास मिळतोय. देशातल्या १३ राज्यांमध्ये आंदोलनांचा भडका उडाला. त्यानंतर या योजनेतली वयाची अट सरकारने वाढवली. या विषयावर अभिनेत्री रविना टंडनने एक ट्विट केलं, त्यानंतर जयंत चौधरी यांनी त्या ट्विटला उत्तर दिलंय.

रविना टंडनने एका मीडिया हाऊसचा व्हीडिओ तिच्या ट्विटरवर पोस्ट केला. त्यात काही लोक असे दिसत आहेत ज्यांचं वय २५ पेक्षा जास्त आहे. ते सगळे ठिय्या देत अग्निपथ योजनेचा निषेध करत आहेत. तसंच योजना मागे घ्या अशा घोषणाही देत आहेत. हा व्हीडिओ पोस्ट करत रविनाने लिहिलं की हे पाहा आंदोलन करणारे २३ वर्षांचे विद्यार्थी.

रविना टंडनने हे ट्विट केल्यानंतर राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी लिहिलंय की रविनाजी आप मस्त रहो… क्यो टेंशन लेती हो. RLD ने अग्निपथ योजनेचा निषेध नोंदवला आहे. तसंच केंद्र सरकारने ही योजना मागे घ्यावी अशीही मागणी केली आहे.

आरएलडी ने ट्विटर हँडलवर हे देखील लिहिलं आहे की माफी वीर आदर्श, जुमला वीर प्रचारक, भाषण वीर नेता… भारतीय लष्कराला अग्नी वीर बनवू नका. एवढंच नाही तर एक कार्यक्रम पत्रिकाही शेअर करण्यात आली आहे ज्यामध्ये अग्निपथ योजना तसंच बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी यांच्या नेतृत्वात युवा पंचायत आयोजित करण्यात आली आहे.

अग्निपथ योजना नेमकी काय आहे?

– भारतीय लष्करात १७.५ ते २३ वर्षे वयोगटातील तरूणांना अग्निवीर म्हणून नोकरी मिळणार आहे. चार वर्षांच्या कालावधीसह ज्यात त्यांच्या प्रशिक्षणही होणार आहे. त्यासह समाविष्ट केलं जाणार आहे.

– चार वर्षात या सगळ्यांना सैन्याचं म्हणजेच लष्करी प्रशिक्षण दिलं जाणार आहे

– यानंतर तुकडीतल्या केवळ २५ टक्के तरूणांनाच सैन्यात भरती करून घेतलं जाईल

– पहिल्या वर्षी ४६ हजार युवकांची अग्निवीर म्हणून भरती केली जाणार आहे

– या अग्निवीरांना महिन्याला ३० ते ४० हजार रुपये वेतन मिळणार आहे. वेतनात दर वर्षी काहीअंशी वाढ होईल. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवा निधी अंतर्गत ११.७१ लाख रुपये मिळतील, जे करमुक्त असतील. भरतीत इच्छुकांना आवश्यक त्या वैद्यकीय पात्रता पूर्ण कराव्या लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed