Home » महाराष्ट्र » “… तर आंदोलक मुस्लीम संघटनेवर कडक कारवाई करावी”, MIM नेते इम्तियाज जलील यांची मागणी

“… तर आंदोलक मुस्लीम संघटनेवर कडक कारवाई करावी”, MIM नेते इम्तियाज जलील यांची मागणी

“…-तर-आंदोलक-मुस्लीम-संघटनेवर-कडक-कारवाई-करावी”,-mim-नेते-इम्तियाज-जलील-यांची-मागणी

दिल्लीनंतर मुस्लीम समुदायाच्या आंदोलनाची धग देशभरातील अनेक शहरापर्यंत पोहोचली आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद, सोलापूर, सातारा अशा अनेक जिल्ह्यात मुस्लीम समुदायानं आंदोलन केलं आहे.

दिल्लीतील जामा मशिदीबाहेर शुक्रवारी (१० जून) नमाज पठणानंतर मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले आणि त्यांनी आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी हातात पोस्टर्स घेत नुपूर शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नमाज अदा केल्यानंतर मुस्लीम नागरिक मोठ्या प्रमाणात जामा मशिदीबाहेर जमा झाले आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं. काही वेळानंतर यातील काही आंदोलक निघून गेले, मात्र काही अद्यापही आंदोलन करत आहेत. दिल्लीनंतर मुस्लीम समुदायाच्या आंदोलनाची धग देशभरातील अनेक शहरापर्यंत पोहोचली आहे. लखनऊ, कानपूर आणि फिरोजाबाद या शहरांसह महाराष्ट्रातील औरंगाबाद, सोलापूर, सातारा अशा अनेक जिल्ह्यात मुस्लीम समुदायानं एकत्र येत आंदोलन केलं आहे.

दरम्यान, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आंदोलन करणाऱ्या मुस्लीम संघटनेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंदोलनाच्या आडून सुरू असलेल्या राजकीय खेळीला त्यांनी आपला विरोध दर्शवला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी म्हटलं की, “ज्या कुणी या आंदोलनाचं आयोजन केलं होतं, त्यांना या गोष्टीची समज असायला हवी होती की, आंदोलनस्थळी किमान माईकची व्यवस्था असायला हवी. माईकची व्यवस्था का नव्हती? या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली होती का? याची चौकशी व्हायला हवी,” असंही जलील यावेळी म्हणाले.

त्यांनी पुढे म्हटलं की, “एवढ्या मोठ्या जमावाला नियंत्रित करायचं असेल तर तिथे माईकची व्यवस्था असायला हवी. ज्याद्वारे आपण लोकांशी संवाद साधू, पण तिथे माईकची व्यवस्था नव्हती. ह्या आंदोलनाचं आयोजन करणाऱ्या संघटनेकडून काही हलगर्जीपणा झाला असेल, तर त्यांच्याविरोधात कडक कारवाई करावी. कारण कोणत्याही स्थितीत शहरातील स्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नाही. ज्या मुद्द्यावर मुस्लीम समुदाय एकत्र आला आहे, त्याच्या आडून जर कुणी शहरातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी,” अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे.

Web Title: Aimim leader imtiaz jaleel big statement on muslim protest all over india prophet mohammad nupur sharma rmm

Leave a Reply

Your email address will not be published.