Home » महाराष्ट्र » Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं, तुमच्या शहरातील नेमके दर काय?

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं, तुमच्या शहरातील नेमके दर काय?

petrol-diesel-price-today:-पेट्रोल-डिझेल-स्वस्त-झालं,-तुमच्या-शहरातील-नेमके-दर-काय?

दिल्ली ते मुंबई पेट्रोल आणि डिझेल किती स्वस्त?

राजधानी दिल्लीत काल म्हणजेच शनिवारी पेट्रोलचा दर 105 रुपये 41 पैसे होता, जो आता 96 रुपये 72 पैसे प्रति लिटर झाला आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 8 रुपये 69 पैशांनी घट झाली आहे. तसेच देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 9 रुपये 16 पैशांनी स्वस्त झाले आहे. मुंबईत पेट्रोल आता 111.35 रुपये प्रतिलिटर आहे. विशेष म्हणजे दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार महानगरांपैकी फक्त दिल्लीतच पेट्रोलचा दर 100 रुपयांपेक्षा कमी आहे, तर उर्वरित तीन महानगरांमध्ये मात्र 100 रुपयांच्या पुढे पेट्रोलची विक्री होत आहे.

त्याचप्रमाणे दिल्लीकरांना डिझेलच्या दरात प्रतिलिटर सात रुपये पाच पैशांनी दिलासा मिळाला आहे. कालपर्यंत दिल्लीत एक लिटर डिझेल 96 रुपये 67 पैशांनी विकले जात होते मात्र आजपासून ते 89 रुपये 62 पैशांनी विकले जात आहे. त्याचप्रमाणे मुंबईत डिझेलचा दर 104 रुपये 77 पैशांवरून आता 97 रुपये 28 पैसे प्रति लिटरवर आला आहे. मुंबईत डिझेल 7 रुपये 49 पैशांनी स्वस्त झाले आहे.

डिझेल कोलकात्यात 7 रुपये 7 पैसे आणि चेन्नईमध्ये 6 रुपये 70 पैशांनी स्वस्त झाले आहे. राज्य स्तरावर वाहनांच्या इंधनावरील व्हॅटच्या वेगवेगळ्या दरांमुळे, शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगळे आहेत.

प्रमुख महानगरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर

> दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

> मुंबईत पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

> कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

> चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

Leave a Reply

Your email address will not be published.