Home » महाराष्ट्र » “मी बायसेक्शुअल असल्याचं कळताच आई आणि भावाने…”, विकास गुप्ताने केला होता धक्कादायक खुलासा

“मी बायसेक्शुअल असल्याचं कळताच आई आणि भावाने…”, विकास गुप्ताने केला होता धक्कादायक खुलासा

“मी-बायसेक्शुअल-असल्याचं-कळताच-आई-आणि-भावाने…”,-विकास-गुप्ताने-केला-होता-धक्कादायक-खुलासा

आज विकास गुप्ताचा वाढदिवस असून त्याने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

‘बिग बॉस’ (Bigg Boss) फेम होस्ट, निर्माता आणि दिग्दर्शक विकास गुप्ताचा (Vikas Gupta) आज ३४ वा वाढदिवस आहे. विकास त्याच्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान, त्याने एकदा त्याच्या खासगी आयुष्यावर एक धक्कादायक खुलासा केला होता. ज्यामुळे तो प्रचंड चर्चेत आला होता.

विकासने २०२० मध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तो बायसेक्शुअल असल्याचे उघडपणे सांगितले. त्याने हा खुलासा केल्यानंतर त्याच्या आई आणि भावाने त्याला सोडून दिलं होतं. याविषयी त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. “माझी आई आणि भावाने घर सोडले कारण मी सर्वांसमोर बायसेक्शुअल असल्याचे उघड केले होते. माझ्या कुटुंबाला याची खूप लाज वाटते,” असे विकास म्हणाला होता.

आणखी वाचा : “हो मी व्हर्जिन…”, सलमान खानच्या उत्तराने चाहत्यांना बसला होता आश्चर्याचा धक्का

आणखी वाचा : राज ठाकरेंच्या नातवाचे झाले नामकरण, नावाचा अर्थ माहितीये का?

विकासने केलेले आरोप ऐकल्यानंतर त्याची आई शारदा गुप्ता यांनी या सगळ्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले होते. “आम्ही विकासपासून दूर झालो आहोत, मात्र याचे कारण तो बायसेक्शुअल असणं मूळीच नाही. ही गोष्ट सगळ्यांना माहित होण्यापूर्वीच आमचे नाते संपुष्टात आले होते. आम्हाला त्याच्याबद्दल आधीच माहित होते, पण तरीसुद्धा आम्ही त्याच्यावर प्रेम केले आणि त्याला स्वीकारले,” असे शारदा म्हणाल्या होत्या.

आणखी वाचा : रानू मंडल आणि सलमान खानची जुगलबंदी? व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू

विकासने २०१० मध्ये व्हिज्युअल आर्टिस्ट म्हणून करिअरला सुरुवात केली होती. यानंतर, एकता कपूरला त्याचं काम फार आवडलं आणि तिने विकासला बालाजी टेलिफिल्म्समध्ये क्रिएटिव्ह हेडचे पद देऊ केलं. त्यानंतर विकासने ‘सास भी कभी बहू’सारखे अनेक शो यशस्वी केले. काही वर्षांनंतर विकास गुप्ताने स्वतःचं प्रोडक्शन हाऊस ‘लॉस्ट बॉय प्रॉडक्शन’ सुरू केलं. त्याच्या बॅनरखाली ‘गुमराह’, ‘ये है आशिकी’ सारखे अनेक शो बनविण्यात आले.

Web Title: When vikas gupta reveal that he is bisexual his mother and brother leaved house dcp

Leave a Reply

Your email address will not be published.