महाराष्ट्रातून कर्नाटकात कुणीही येऊ नये, बेळगाव प्रशासनाचे आवाहन, का आणि कशासाठी..?

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला यावेळीही परवानगी नाकारल्याचे म.ए. समितीचे नेते शुभम शेळके यांनी सांगितल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
बेळगावः कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने 19 डिसेंबर रोजी महामेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रणही देण्यात आले आहे. मात्र या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांनी येऊ नये यासाठी कर्नाटक पोलिसांकडून आता प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना उद्याच्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना आणणार नाही हे लेखी देण्याच्या सूचना बेळगाव पोलिसांनी म. ए. समितीच्या नेत्यांना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रणही देण्यात आले आहे. पण या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांनी येऊ नये, यासाठी कर्नाटक पोलिसांकडून आता प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादमध्ये समन्वय राखून खबरदारी घेण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली होती मात्र बेळगाव पोलिसांकडून महाराष्ट्र एकीकरण समितीवर दबावतंत्र आणण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महाराष्ट्रातील नेत्यांचे आम्ही स्वागतच करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला यावेळीही परवानगी नाकारल्याचे म.ए. समितीचे नेते शुभम शेळके यांनी सांगितल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी याबाबत हस्तक्षेप करूनही कर्नाटक प्रशासनाकडून अडेलतट्टूपणाची भूमिका घेतली जात असल्याने मराठी भाषिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मधस्ती केल्यामुळे कर्नाटक प्रशासनाकडून मराठी भाषिकांबाबत भूमिका मवाळ होईल अशी आशा असताना महामेळाव्याच्या पूर्वसंध्येला बेळगाव प्रशासनाकडून अशी भूमिका घेतली गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बेळगावमध्ये मराठी भाषिकांचा महामेळावा होऊ नये यासाठी आता बेळगाव पोलिसांकडून मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांवर अन्याय सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे.