कवठेमहांकाळ – विद्याधर रास्ते.
मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा सर्वत्र जोर धरू लागली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. पण लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये हे बिल पास करावे, अशी मागणी करणारे निवेदन मराठा स्वराज्य संघाच्या कवठेमंकाळ शाखेच्यावतीने मा.तहसीलदार सो. यांच्याकडे देण्यात आले. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपापसातील मतभेद दूर ठेवून मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यावा, व मराठ्यांना आरक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. अशी अपेक्षा मराठा स्वराज्य संघाचे कवठेमंकाळ तालुका अध्यक्ष, मा. अमोल जाधव यांनी व्यक्त केली. मराठा समाज आरक्षणा चे बिल संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पास करून, ते घटना परिशिष्ट क्रमांक 9 मध्ये घेऊन माननीय राष्ट्रपतींच्या अंतिम सहीने मंजूर करून, मराठा समाजाला आरक्षण लागू करावे, अशी भूमिका सर्व राजकीय पक्षांनी घ्यावी असे निवेदनात नमूद केले आहे. मा.संतोष भोसले, विक्रांत निकम, वैभव पाटील, आनंदराव निकम, कुमार जाधव. यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
