Home » मनोरंजन » 'दाखवण्यासाठी काही नाही म्हणून न्यू एंट्री', 'मन झालं बाजिंद'वर नेटकरी नाराज

'दाखवण्यासाठी काही नाही म्हणून न्यू एंट्री', 'मन झालं बाजिंद'वर नेटकरी नाराज

'दाखवण्यासाठी-काही-नाही-म्हणून-न्यू-एंट्री',-'मन-झालं-बाजिंद'वर-नेटकरी-नाराज

मुंबई, 16 एप्रिल- मन झालं बाजिंद(  man zala bajind ) या मालिकेतील कृष्णा आणि राया यांच्या नात्यात काही ना काही दुरावा येतचं असतो. आता मालिकेत नवीन ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. लवकरच मालिकेत दादासाहेबांची  ( dadasaheb vidhate ) एंट्री होणार आहे. मात्र मालिकेतील हा ट्वीस्ट काहीसा नेटकऱ्यांना रूचलेला नाही. अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये कृष्णा फुई आजीला दादासाहेबांच्या स्वभावाविषयी विचारत असल्याचे दाखवले आहे. फुईआजीच्या म्हणण्यानुसार स्वभावाने चांगले, मदतीला धावून जाणारे, वावगं काहीही न खपणारे दादासाहेब आहेत. दादासाहेब म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून रायाचे आजोबा आणि भाऊसाहेब विधाते यांचे वडील आहेत. आजपर्यंत या दादासाहेबांचे नावही विधात्यांच्या घरात नव्हते तिथे त्यांची आज एंट्री होणार आहे. मग ते आजपर्यंत नेमके कुठे होते? घर सोडून ते का गेले होते? आणि आता पुन्हा घरी येण्याचे कारण काय असे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात डोकावले आहेत. दादासाहेब विधात्यांच्या घरी आल्यावर राया आणि कृष्णाच्या नात्याला त्यांचा काय फायदा होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अर्थात दादासाहेब विधाते यांच्या भूमिकेत कोणता कलाकार पडदयावर दिसणार आहेत याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही. मंदिराच्या कळसावरील झेंडा लावत असताना तो रायाच्या हातून निसटतो. तो थेट दादासाहेबांच्या हातात येतो. असा सीन प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्याने दादासाहेबांची भूमिका कोण करणार ही उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी या नवीन ट्वीस्टमुळे मालिका मात्र ट्रोल होत आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, दाखवण्यासाठी काही नाही म्हणून मग new entry. प्रेक्षक like “आयडिया जुन्या झाल्या”😂😂😂😂 तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की,मालिका वाढवण्यासाठी अजून एक ट्विस्ट 😂 तर आणखी एकानं म्हटलं आहे की, कथेत दाखवायला काहीच राहिलं नाही म्हणून हा नवीन एंट्री…आधी खूप आवडीनं मालिका पाहायचो पण आता सगळं चार्म गेलंय.. सगळं ओढून ताणून मालिका खेचायची म्हणून चालयं…अशा अनेक कमेंट करत मालिकेतील या नवीन एंट्रीवर आणि कथानकावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Published by:News18 Trending Desk

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.