Home » मनोरंजन » अभिनेत्रीवर स्पॉट बॉयचं काम करण्याची वेळ, बहिणीमुळे झाली अशी अवस्था

अभिनेत्रीवर स्पॉट बॉयचं काम करण्याची वेळ, बहिणीमुळे झाली अशी अवस्था

अभिनेत्रीवर-स्पॉट-बॉयचं-काम-करण्याची-वेळ,-बहिणीमुळे-झाली-अशी-अवस्था

मुंबई, 27 मार्च- अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ( Mrunmayee Deshpande) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नेहमी ती तिचे व्हिडिओ तसेच फोटो शेअर करत असते. शिवाय तिच्या कामाबद्दल अपडेट देखील देत असते. याशिवाय बहीण गौतमीसोबत देखील भन्नाय व्हिडिओ शेअर करत असते. मृण्मयी देशपांडेने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. मृण्मयी देशपांडेने इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये जेव्हा तिच्या स्पॉट बॉय सुट्टीवर असतो तेव्हा त्याची जागा कोण घेते हेच तिनं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यादिवशी तिचं सगळं काम बहीण म्हणजे अभिनेत्री गौतमी देशपांडे करते. अगदी कॉफी करण्यापासून तिच्या बॅगा( mrunmayee deshpande and gautami deshpande )सांभाळण्यापर्यंत सर्व काम गौतमी करते. शेवटी बहिणीचं नातेच तसं आहे. वाचा-ही तर काजोलची कार्बन कॉपी,Lakme वीकमध्ये न्यासाला पाहून लोकांच्या प्रतिक्रिया मृण्मयी देशपांडे एका इव्हेंडटसाठी तयार होताना दिसत आहे. त्यादिवशी तिचा स्पॉट बॉय नेमका सुट्टीवर आहे. मग बहीण गौतमीलाचं तिनं स्पॉट बॉयचं काम देऊन टाकलं. काम करून गौतमीची खूपच वाईट अवस्था झाल्याचे दिसत आहे. पण तिनं हे सगळं प्रेमापोटी केलं असल्याचे देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसा हा व्हिडिओ फनी टच देऊनट शूट केला आहे. चाहत्यांना देखील हा व्हिडिओ खूप आवडलेला आहे. यामध्ये दोघींचे खास बॉन्डिंग दिसते. चाहत्यांनी देखील यासाठी त्यांच कौतुक केलं आहे. वाचा-PHOTO: हृता दुर्गुळे याठिकाणी घेतेय सुट्टीचा आनंद, समोर आले सुंदर फोटो मृण्मयी आणि गौतमीला मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे या दोन्ही बहिणी खूप चांगल्या अभिनेत्री असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. त्या अभिनयासोबतच आणखी एका गोष्टीत अव्वल आहेत. गौतमी आणि मृण्मयी दोघीही उत्तम गायिका आहे. अनेक वेळा त्या दोघी त्यांचे गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. मृण्मयी आणि गौतमी यांना गाण्याचा वारसा त्यांच्या आजीकडून मिळाला आहे.

झी मराठीवरील ”माझा होशील ना” या मालिकेतून गौतमी देशपांडे घराघरात पोहोचली. या मालिकेत गौतमी साकारत असलेली सईची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत गौतमीने सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.

Published by:News18 Trending Desk

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.