अभिनेत्रीनं अभिनय सोडून सुरू केलं दुसरं काम, लोकांचा मिळतोय प्रतिसाद छान!

मुंबई, 22 मार्च- सध्या कलाकार अभिनया शिवाय व्यवसाय देखील करताना दिसतात. याशिवाय काही कलाकार रेडिओ जॉकी म्हणून काम करताना देखील दिसतात. अभिजित खांडकेकरला देखील रेडिओ जॉकी म्हणून काम करत असताना मालिका चित्रपटातून अभिनयाची संधी मिळाली. अशीच एक छानशी संधी आता मराठी मालिका विश्वातील (amruta deshmukh ) अभिनेत्रीला मिळालेली आहे. आता ही अभिनेत्री (amruta deshmukh radio jokey ) रेडिओ जॉकी म्हणून काम करताना दिसणार आहे. मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या अमृता देशमुख हिने आता रेडिओ जॉकी म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे.98.3 मिर्चीमराठी एफएम वर सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अमृताचा ‘टॉकरवाडी’ हा शो प्रसारित केला जात आहे. वाचा-यह टायर तो फायर निकला…अमोल कोल्हेंचा टायरनं काढला घाम,Video Viral उठा उठा सकाळ झाली अमृताच्या मॉर्निंग शो ची वेळ झाली, मी अमृता देशमुख मिर्ची ची ब्रँड न्यू होस्ट, मला आतापर्यंत तुम्ही फ्रेशर्स मधली परी किंवा स्वीटी सातारकरमधली स्वीटी म्हणून पाहिलं असेल पण एक सांगू का खऱ्या आयुष्यात ना मी कुणाची परी आहे ना मला स्वीटी म्हणावं एवढी मी स्वीट आहे मला वाटतं मी जरा नमकीन आहे अगदी बाकरवडी सारखी आणि म्हणूनच माझं नाव आहे टॉकरवाडी असे म्हणत अमृता रेडिओजॉकी बनून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.
स्वीटी सातारकर, फ्रेशर्स, आज्जी आणि नात, मी तुझीच रे, एक कुटुंब तीन मिनार, देवाशप्पथ, कलाकार, बाबुरावला पकडा या चित्रपट आणि मालिकांमधून अमृता देशमुखने आजवर अनेक महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. झी युवा वरील फ्रेशर्स या मालिकेत तिने साकारलेली परीची भूमिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घरघरात पोहचली. तिच्या अभिनयाचे कौतुक झालं. अभिनयासोबतच डान्सची आवड देखील तिने जोपासली आहे. आता ती नवीन भूमिकेत आपल्या समोर येत आहे. प्रेक्षकांकडून तिच्या शोला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.