धनुष-ऐश्वर्याच्या घटस्फोटामुळे सुपरस्टार रजनीकांत चिंतेत, अशी सुरुय धडपड

मुंबई, 27 जानेवारी- साऊथमधील (South Stars) सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असणारे धनुष (Dhanush) आणि ऐश्वर्या (Aishwarya) आता विभक्त होत आहेत. दोघांनी नुकताच आपल्या घटस्फोटाची घोषणा केली आहे. तब्बल 18 वर्षानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला आहे. नेमकं त्यांच्यामध्ये काय झालं हे जाणून घेण्यासाठी चाहते धडपडत आहेत. दरम्यान असं समोर आलं आहे की, सुपरस्टार रजनीकांतसुद्धा (Rajinikanth) आपल्या लेकीच्या घटस्फोटामुळे चिंतेत आहेत. इतकंच नव्हे तर त्यांनी या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच 17 जानेवारीला धनुष आणि ऐश्वर्याने आपल्या सोशल मीडियाद्वारे घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. परंतु या विषयवार बोलताना धनुषचे वडील कस्तुरी राजा यांनी त्याला ‘कौटुंबिक वाद’ समजलं होतं. तर दुसरीकडे सुपरस्टार रजनीकांत यांना आपल्या लेकी आणि जावयाच्या घटस्फोटाने मोठा धक्का बसला आहे. Wion च्या रिपोर्टनुसार, सुभाष के झा यांना जवळच्या सूत्रांनी अशी माहिती दिली आहे, मुलगी आणि जावयाच्या या निर्णयाचा रजनीकांत याना धक्का बसला आहे. धनुष आणि ऐश्वर्याने आपल्यातील मतभेद विसरून पुन्हा एकत्र यावं अशी त्यांची इच्छा आहे. धनुष आणि ऐश्वर्यामध्ये भांडण झाल्याचं म्हटलं जातं. परंतु भांडण होण्याची ही काही पहिली वेळ नाहीय. याआधीही त्या दोघांमध्ये अनेक टोकाचे मतभेद झाले आहेत. परंतु प्रत्येक वेळी रजनीकांत यांनी या परिस्थितीला सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु यावेळी परिस्थिती हातातून बाहेर गेलेली दिसत आहे. धनुष आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटावर सुपरस्टार रजनीकांत यांनी सार्वजनिक ठिकाणी किंवा कॅमेरासमोर कोणतंच विधान केलेलं नाहीय. परंतु ते आपल्या लेकीच्या आणि जावयाच्या फारच जवळ आहेत. अनेकवेळा सोशल मीडियावर या तिघांचे सुंदर फोटो व्हायरल होत असतात.
Published by:Aiman Desai
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, South indian actor
pN2HJDzBmF
KsVpCvt9mc
Sn2VtX57Yv
gMZJec7xGt
yptJrGeR6h
b4dCVGM5B2
UmNA7eJ5T6
qXe3nY4zwV
VPwdpcn3Hs
XCVaHTf6Sh
PH2mWdNpYS
L8jHaDNApF
uCx7p28dAZ
YKzMW8Rrbj
t3sUEze84c
ewqLAJ6xHS
Vh42H97ZTn
Gdx6CKmquF
e4936BYyVA
ZK4mTsenH9
QbB5LnkVxE
BGTQ72UPaM
Bqe5Av3jHt
Ys8HSVvEzK
A7CH2xdVqD
G6FfQU8TVB
A63ULcT5fe
CeUc7Yy3fj
rGepnEmx9z
tvjP6sZEQf
MbSw539kFV
ED6fvrQsac
LRqSXhmy7c
g2TYCfexMU
ZbVs2Bc4z6
Enu5LDmzXV
A3wgWG5ufn
wY4DAeX3k5
Hzj3GT6UFf
kesfF7W49G
zAsQCWvf9M
Hm2MZzT3vG
fw7qLCGNm5
sxey5wDjCR
UW7hdMjg6J
zPhjHf6LCa
R9F2r3fZgX
HMf3g8GLzc
nfEhpgwM7W
sjnXCJg6Zk
pQcn9TVd4z
yLkAptz2sS
BtUyKCL65V
yTtjWf9QVD
H7vy4zMgSk
WYVh7kUmpc
Mc8JGQV3rx
d2z97CAaSU