Home » मनोरंजन » 'महेश बाबूला मराठी बोलता येतं?' चाहत्याच्या प्रश्नावर नम्रताने केला होता खुलासा

'महेश बाबूला मराठी बोलता येतं?' चाहत्याच्या प्रश्नावर नम्रताने केला होता खुलासा

'महेश-बाबूला-मराठी-बोलता-येतं?'-चाहत्याच्या-प्रश्नावर-नम्रताने-केला-होता-खुलासा

मुंबई,27 जानेवारी-   अभिनेता महेबाबू    (Mahesh Babu)  आणि माजी मिस इंडिया इंडिया नम्रता शिरोडकर   (Namrta Shirodkar)   यांना साऊथमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक समजलं जातं. ते सतत सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांना त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घ्यायला नेहमीच आवडतं. दरम्यान एका चाहत्याने सोशल मीडियावर नम्रताला महेशबाबूच्या बाबतीत एक महत्वाचा प्रश्न विचारला होता. त्यावर अभिनेत्रीने मजेशीर उत्तर देत ती सोशल आपल्या मनातील इच्छा जाहीर केली. होती. महेशबाबूची पत्नी आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर सध्या चित्रपटांपासून दूर आहे. ती आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये मग्न आहे . परंतु ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. काही दिवसांपूर्वी नम्रताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘आस्क मी एनिथिंग’ हा सेशन ठेवला होता. दरम्यान चाहत्यांनी अभिनेत्रीला अनेक प्रश्न विचारले. काहींनी तिला तिच्या प्रोफेशनल लाईफबद्दल प्रश्न विचारले तर काहींनी तिला पर्सनल लाईफबद्दल. अनेकांनी तिला पती महेशबाबूबद्दलसुद्धा प्रश्न विचारले होते. या सेशनमध्ये एका चाहत्याने नम्रताला एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारला होता. अभिनेत्रीनेसुद्धा तितकंच इंटरेस्टिंग उत्तर दिलं होतं. एका चाहत्याने नम्रताला प्रश्न करत विचारलं होतं, ‘महेशबाबू मराठीमध्ये बोलू शकतात का?’ कारण अभिनेत्री नम्रता शिरोडकर एक मराठमोळी मुलगी आहे. तिने साऊथ सुपरस्टार महेशबाबूसोबत लग्न केलं आहे. त्यामुळे अनेकांना हा प्रश्न पडतो. यावर उत्तर देत अभिनेत्रीने म्हटलं होतं, ‘माझीसुद्धा फार इच्छा आहे’. परंतु अभिनेत्रीने सांगितलं की माझ्या दोन्ही मुलांना इंग्लिश आणि तेलुगूसोबतच मराठी भाषासुद्धा येते. आणि ते मराठी बोलू शकतात. महेशबाबू आणि नम्रता शिरोडकर पहिल्यांदा ‘वामसी’ या तामिळ चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. त्यांनतर त्यांनी एकमेकांना तब्बल ५ वर्षे डेट केलं आहे. आणि नंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांना गौतम आणि नितारा अशी दोन अपत्ये आहेत. आपल्या दोन्ही मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ हे कलाकार सतत आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. महेशबाबू आणि नम्रताची मुलगी आत्तापासूनच नृत्याचे धडे घेताना दिसून येते.

Published by:Aiman Desai

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Entertainment, South actress

1 thought on “'महेश बाबूला मराठी बोलता येतं?' चाहत्याच्या प्रश्नावर नम्रताने केला होता खुलासा

Leave a Reply

Your email address will not be published.