Home » मनोरंजन » 'समंथाला हवा होता घटस्फोट',मुलगा आणि सुनेच्या घटस्फोटावर नागार्जुन म्हणाले…

'समंथाला हवा होता घटस्फोट',मुलगा आणि सुनेच्या घटस्फोटावर नागार्जुन म्हणाले…

'समंथाला-हवा-होता-घटस्फोट',मुलगा-आणि-सुनेच्या-घटस्फोटावर-नागार्जुन-म्हणाले…

मुंबई, 27 जानेवारी-   साऊथमधील   (South)  पॉवर कपल म्हणून अभिनेत्री समंथा प्रभू   (Samantha Prabhu)  आणि नागा चैतन्य  (Naga Chaitnya)   लोकप्रिय होते. यांची जोडी प्रचंड पसंत केली जात होती. परंतु त्यांच्या घटस्फोटाने सर्वांनाच धक्का बसला होता.समंथा आणि नागा चैतन्यने आपल्या सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत आपण विभक्त झाल्याची माहिती दिली होती. दरम्यान आता नागा चैतन्यचे वडील आणि अभिनेते नागार्जुन  (Nagarjun)  यांनी या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. इंडिया गिलिट्सला दिलेल्या एका मुलाखतीत नागार्जुन यांनी मोठा खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, समंथाला घटस्फोट हवा होता. यावर नागाने होकार दिला. परंतु तो कुटुंबाची प्रतिमा आणि माझ्यासाठी चिंतेत होता. ही माहिती जेव्हा आमच्या पर्यंत आली तेव्हा आम्हालाही धक्का बसला. कारण ते दोघेही एकमेकांच्या फारच जवळ होते. या चार वर्षाच्या लग्नामध्ये आम्ही त्यांना कधीच भांडताना पाहिलेलं नाहीय. तरीसुद्धा त्यांनी इतका मोठा निर्णय का घेतला कळत नाहीय’. नागा चैतन्य सध्या आपल्या ‘Bangarraju’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.या प्रमोशनच्या दरम्यान नागाने आपल्या आणि समंथाच्या नात्याबद्दल खुलासा करत म्हटलं, घटस्फोटाचा निर्णय योग्य होता. या निर्णयामुळे ते दोघेही आनंदी आहेत. हा निर्णय आम्ही दोघांच्या इच्छेने घेतला होता. या निर्णयाने ती आनंदी आहे तर मीसुद्धा, अशा स्थितीत घटस्फोट घेणंच योग्य होतं’. असं नागाने म्हटलं होतं.

नागा चैतन्य आणि समंथा प्रभू यांना साऊथमधील पॉवर कपल म्हणून ओळखलं जात होतं. परंतु या दोघांनी आपलं चार वर्षांचं नातं क्षणार्धात संपवलं होतं. या दोघांच्या निर्णयाने त्यांचे चाहते मात्र फारच नाराज झाले होते. त्यांना या दोघांच्या घटस्फोटावर विश्वास ठेवणं कठीण झालं होतं. सध्या नागा चैतन्य आणि समंथा प्रभू आपापल्या कामात व्यग्र आहेत. ते सध्या आपल्या करिअरवर लक्ष देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

1 thought on “'समंथाला हवा होता घटस्फोट',मुलगा आणि सुनेच्या घटस्फोटावर नागार्जुन म्हणाले…

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed