Home » मनोरंजन » मनीष मल्होत्राच्या घरातून बाहेर पडताच अशा अवस्थेत दिसली करीना कपूर; VIDEO VIRAL

मनीष मल्होत्राच्या घरातून बाहेर पडताच अशा अवस्थेत दिसली करीना कपूर; VIDEO VIRAL

मनीष-मल्होत्राच्या-घरातून-बाहेर-पडताच-अशा-अवस्थेत-दिसली करीना-कपूर;-video viral

मुंबई, 27 जानेवारी : 26 जानेवारीला मनीष मल्होत्राच्या घरी सेलिब्रेटींनी पार्टी केली. या पार्टीत करीनासोबतच (Manish Malhotra Party) करण जोहर, अमृता, मलायका अरोरा सहभागी झाले होते. या पार्टीचे फोटो सेलिब्रेटींनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. मात्र चर्चा रंगली ती केवळ करीनाची. मनीष मल्होत्राच्या घरातून बाहेर पडताना करीना (Kareen Kapoor Viral Video) अशा अवस्थेत दिसली की ती आता सोशल मीडियावर ट्रोल होते आहे. अभिनेत्री करीना कपूरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Kareen Kapoor Viral Video) खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओत करीना प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरातून बाहेर पडताना दिसते आहे. त्याचवेळी तिचा तोल ढासळतो. तिचे हावभाव पाहून ती दारूच्या नशेत असल्याची कमेंट या व्हिडिओवर अनेकांनी केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर करीना मोठ्या प्रमाणात ट्रोल होते आहे. “करीना जास्त प्यायलीय का?” असा सवाल एका चाहत्यानं केला आहे. तर एकाने ती दारूच्या नशेत खूप टल्ली असल्याचं म्हटलं आहे.

या व्हिडिओत करीनासोबत मलायका आणि अमृता अरोरादेखील दिसत आहेत. “या तिघीही कोविड फ्री असाव्यात अशी आशा आहे”, अशी कमेंटही एका युझरनं केली आहे. डिसेंबर महिन्यात करीना कपूर आणि अमृता अरोराला कोरोनाची बाधा झाली होती. कोरोनाचं निदान होण्यापूर्वी केलेल्या पार्ट्यांमुळे त्यांच्यावर बरीच टीका करण्यात आली होती. हे वाचा: ‘समंथाला हवा होता घटस्फोट’,मुलगा आणि सुनेच्या घटस्फोटावर नागार्जुन म्हणाले… दरम्यान अमृता अरोराला तिच्या वाढलेल्या वजनामुळे खूप ट्रोल करण्यात येत आहे. तर दुसरीकडे काही युझर्सने करण जोहरच्या कपड्यांचीही खिल्ली उडवली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

1 thought on “मनीष मल्होत्राच्या घरातून बाहेर पडताच अशा अवस्थेत दिसली करीना कपूर; VIDEO VIRAL

Leave a Reply

Your email address will not be published.