Home » मनोरंजन » PHOTO : नवाझुद्दीन सिद्दीकीचं मुंबईत आलिशान घर, महालासारखं बंगला पाहिलात का?

PHOTO : नवाझुद्दीन सिद्दीकीचं मुंबईत आलिशान घर, महालासारखं बंगला पाहिलात का?

photo-:-नवाझुद्दीन-सिद्दीकीचं-मुंबईत-आलिशान-घर,-महालासारखं-बंगला-पाहिलात-का?
Actor Nawazuddin Siddiqui New Bunglow In Mumbai See Photos | PHOTO : नवाझुद्दीन सिद्दीकीचं मुंबईत आलिशान घर, महालासारखं बंगला पाहिलात का?

नवाझुद्दीन सिद्दीकीने सुरवातीच्या काळात सिनेमे मिळत नसताना पडेल ते काम केलं. पण आज एक यशस्वी अभिनेता झाल्यानंतर मुंबईत एक आलिशान घर (Nawazuddin Luxurious Home) बनवलं आहे. (P.C. nawazuddin siddiqui instagram)

महालासारख्या वाटणाऱ्या या बंगल्याचे फोटो नवाझुद्दीनने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. (P.C. nawazuddin siddiqui instagram)

काही दिवासांपूर्वीच मुंबईतील नवाझुद्दीनच्या घराचं काम पूर्ण झालं असून या त्याच्या बंगल्यापुढे एक सुंदर गार्डन देखील आहे. (P.C. nawazuddin siddiqui instagram)

नवाझुद्दीनने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये तो या गार्डनमध्ये एका खुर्चीवर बसून कोणतंतरी पुस्तक वाचताना दिसत आहे. (P.C. nawazuddin siddiqui instagram)

दरम्यान नवाझुद्दीनने या घराचं काम करवून घेतना त्याच्या जुन्या घराच्या इंटीरियरची प्रेरणा घेऊन हे घरं तयार करवून घेतलं आहे. (P.C. nawazuddin siddiqui instagram)

विशेष म्हणजे नवाझुद्दीनने या घराचं नाव त्याच्या वडिलांच्या आठवणीत ‘नवाब’ असं ठेवलं आहे. (P.C. nawazuddin siddiqui instagram)

नवाझुद्दीन त्याच्या घराबाहेरील गार्डनमध्ये फोटोशूट करुन हे फोटो बऱ्याचदा शेअर करताना दिसत असतो. (P.C. nawazuddin siddiqui instagram)

सध्याच्या घडीला नवाझुद्दीन हिंदीतील एक आघाडीचा अभिनेता असून त्याचे आगामी सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार असून त्याचा चाहतावर्ग सिनेमांची आतुरतेने वाट पाहत आहे. (P.C. nawazuddin siddiqui instagram)

Tags: Nawazuddin Siddiqui Actor Nawazuddin Siddiqui Nawazuddin Siddiqui New bunglow Nawazuddin Siddiqui bunglow mumbai

1 thought on “PHOTO : नवाझुद्दीन सिद्दीकीचं मुंबईत आलिशान घर, महालासारखं बंगला पाहिलात का?

Leave a Reply

Your email address will not be published.