Home » मनोरंजन » VIDEO : 'अनिता भाभी'वर चढला इंग्लिश गाण्याचा फिव्हर; नेहा पेंडसेचा किलर अंदाज

VIDEO : 'अनिता भाभी'वर चढला इंग्लिश गाण्याचा फिव्हर; नेहा पेंडसेचा किलर अंदाज

video-:-'अनिता-भाभी'वर-चढला-इंग्लिश-गाण्याचा-फिव्हर;-नेहा-पेंडसेचा-किलर-अंदाज

मुंबई, 27 जानेवारी: मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे  ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत (Bhabhi Ji Ghar Par Hain) सध्या अनिता भाभीचं पात्र साकारते आहे. या मालिकेतील अभिनयाबरोबरच तिच्या सौदर्यांची चाहत्यांना भुरळ पडली आहे. त्यातच एका इंग्रजी गाण्यावर थिरकतानाचा नेहाचा व्हिडिओ (Neha Pendse dance video) सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. या व्हिडिओतील तिच्या डान्स मूव्ह्जनं चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे. ‘I really like to party’ या गाण्यावरील व्हिडिओ नेहानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात तिनं काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि त्यावर पांढऱ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. खुले केस, चेहऱ्यावरील मादक हावभाव आणि हॉट अंदाजातील तिच्या या व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पडतो आहे. शूटिंगबरोबरच रियल लाईफमध्येही नेहा नेहमीच ग्लॅमरस अंदाजात (Neha Pendse Beautiful Photo) वावरताना दिसते. तिने नुकतच सौम्या टंडनला ‘भाभीजी घर पर है’ मालिकेतून रिप्लेस केलं आहे.

ब्लू मोनोकिनीमध्ये नेहाचा हॉट अवतार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed